•रुग्णांची हेळसांड ,एकूण आठ M.O मात्र उपस्थित एकच…
अजय कंडेवार,वणी:- ग्रामीण रुग्णालयात डॉ. सुलभेवार (वैद्यकीय अधिक्षक), डॉ. पोहे, डॉ. आवारी, डॉ. नोळे, डॉ. कु. गावंडे, डॉ. मूग, डॉ. निमाये व डॉ. महूरवार अशा 8 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती राजपत्रीत करण्यात आली आहे. परंतु काल दि. 20 जुलै रोजी सकाळी १०.०० ते १२.०० चे दरम्यान वणी ग्रामिण रुग्णालयात वरील वैद्यकिय अधिकाऱ्यांपैकी केवळ डॉ. मून हे एकच वैद्यकीय अधिकारी ओ. पी. डी. द्वारे रुग्णांची तपासणी करत असल्याचे आढळून आले.The rural hospital’s M.O became “decorative dolls.” Schedule of patients, total eight M.O. but only one present.
विशेष म्हणजे यावेळी अनेक रुग्ण तपासणीसाठी रांग लावून उभे असल्याचे दिसले. ही बाब नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार घातकच म्हणायला हरकत नाही. या रुग्णालयात एकूण आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असतांनासुद्धा ओ. पी. डी. च्या वेळी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणे म्हणजे नागरीकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत वास्तविक पाहता या ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या असून याकडे तेथील वैद्यकीय अधिक्षक जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे समजते. विशेष म्हणजे वरिल राजपत्रीत अधिकाऱ्यांचे खाजगी दवाखानेसुद्धा आहेत.
त्यामुळे ग्रामिण रुग्णालयाकडे सतत पाठ फिरवित असल्याचे दिसते. ग्रामिण रुग्णालयातील कारभार पूर्णतः अनियंत्रित झाला असून मनमानी पद्धतीने कामकाज सुरू आहे.तरी वणी ग्रामिण रुग्णालयातील समस्यांकडे गंभीरतेने लक्ष देऊन आवश्यक ती कडक कारवाई करा अशी अशी तक्रारकर्त्यांची मागणी आहे अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याकरीता सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. या तक्रारीचा प्रतीलिपी महराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री विद्यमान तानाजी सावंत यांना पाठविण्यात आले आहे.