Ajay Kandewar,वणी:- राजूर येथील रहिवासी असलेले (हल्ली मुक्काम वणी येथील साई नगरीतील) गौरी पुरुषोत्तम पुल्लजवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या 53 वर्षांचे होते. गेल्या एक ते दोन वर्षापासून आजारी होते.
त्यांना जेवणाचा त्रास होत असल्याने ते केवळ हल्का आहार व ज्युस घेत होते. डॉक्टरांच्या मार्गदर्शनात त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होता. मात्र दि.4 जाने.सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते वणीतील मॅकरून शाळेत 10 वर्षे सेवा दिली. त्याचबरोबर त्या अनेक महिला संघटनेत कार्यरत देखिल होते. समाजकारण व राजकारणात त्यांना विशेष रस होता. राजूर गावातील प्रसिद्ध असलेले गजानन मेडिकल चे संचालक पुरुषोत्तम पुल्लजवार यांचे त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,एक मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर रविवार दिं.5 जाने.सकाळी 11 वाजता साई नगरी येथील राहत्या घरून प्रेतयात्रा निघेल आणि वणी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.