• 11 लाखाचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपी अटकेत.
• वणी पोलीसांना बजरंग दलाने केले विशेष सहकार्य…..
अजय कंडेवार,वणी :- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वरोरा वणी मार्गे अवैधरित्या वाहतूक करुन कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून घटनास्थळावरून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 6 नग गोवंशाची सुटका करून आरोपिंना अटक करीत एकूण 11 लाखाचा वर मुद्देमाल जप्त करण्यात वणी पोलीसांना यश आले तसेच हा मुद्देमाल जप्त करण्यात “बजरंग दलाने” विशेष सहकार्य पोलीसांना केले.Cattle smuggling exposed.11 lakh worth of goods seized, 4 accused arrested. Brilliant performance by Wani Police.
वणी पोलीस कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदारांकडून वरोरा ते वणी मार्गावरून काही व्यक्ती जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून गाडीत कोंबून जात असल्याची माहिती दि.26 ऑगस्ट रोजी रात्री चा दरम्यान मिळाली. तात्काळ ठाणेदार P.I अजित जाधव यांना याबाबत कळविले असता ठाणेदार अजित जाधव यांचा पोलीस स्टाफ व पंचासह वरोरा ते वणी मार्गे जाणाऱ्या रस्त्याजवळ सापळा रचला.रात्री 11.30 वाजताचा दरम्यान यामार्गे 4 ईसम हे 6 गोवंशीय जनावरांना 2 बोलेरो पिकअप क्र.MH-34-BG- 4064 व MH-36- AA-0972 वाहनातून गोवंशाना दोरीने बांधुन व कोंबून गाडीत नेतांना दिसले. वणी पोलिसांनी त्यांना थांबवुन त्यांच्या नाव पत्ता विचारले असता त्यांनी ही सदर जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
वणी पोलिसांनी जनावर तस्करांच्या ताब्यातून 6 गोवंश बैलांची सुटका करून चारापाण्या व्यवस्था नसल्यामुळे गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारे आरोपी सचिन धनराज वैद्य (वय 32 वर्ष) रा. अभ्यंकर वार्ड, आकोट तालुका पवनी जि.भंडारा ,अमोल दिनेश्वर घुमे (वय 23 वर्ष) रा. आंबेडकर वार्ड,पवनी जि.भंडारा, राजहंस आत्माराम नागपुरे (वय 41 वर्ष)रा.नेहरू वार्ड,पोस्ट चिंचाळ ता.पवनी जि.भंडारा ,गणेश किरण शेलोकर (वय 20 वर्ष) रा. नेहरू वार्ड, चींचाळ ता.पवनी जि.भंडारा जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध जिल्हा यवतमाळ यांच्या विरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम चे कलम 11(1),(D)11(1)(E),11(1)(H) या नुसार या आरोपीविरुद्ध वणी पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा दाखल केला आहे.सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात व वणी पो. स्टेशन ठाणेदार P.I अजित जाधव , ASI कांबळे, सुहास मंदावार, विशाल गेडाम सुरेश किनाके, भानुदास हेपट यांनी पार पाडली.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.