•चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकने प्रकरण…
अजय कंडेवार,वणी :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांवर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पोलिसांनी चुकीचे गुन्हे दाखल केले असून, ते मागे घेण्याचा मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने निवेदनातून आज दिनांक 12 डिसें रोज सोमवारला वणी उपविभागीय अधिकारी यांचा मार्फत राष्ट्रपती यांना साकडे घालण्यात आले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर वणी येथे शाई फेकल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल झाले. ते मागे घेण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अभद्र टिपणी केली होती. तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलही एकेरी भाषेचा वापर करून त्यांचा अपमान केला होता, तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवार भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपमान जनक भाष्य करून तनाम महाराष्ट्रातील बहुजन शेतकरी शेतमजूर मराठा ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहे .तसेच भारतीय जनता पार्टीतील अनेक खासदार आमदार आणि मंत्री सातत्याने बहुजन महापुरुषांच्या जीवनकार्याबद्दल त्यांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती प्रसारित करून व त्यांच्याबद्दल अभय टिपणी करून त्यांचा अपमान करीत आहे.त्यामुळे सातल्याने होत असलेला अपमान उभा महाराष्ट्र आता सहन करणार नाही त्यामुळे महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला शासनाच्या कोणत्याही पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही अशा सर्व विकृत मानसिकतेच्या माणसांना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात यावे तसेच भारतीय जनता पार्टीचे सरकार बरखास्त करण्यात यावे जेणेकरुन या महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांना मानणान्या वर्गाला न्याय मिळेल तसेच यांचेवर जातीवाचका 21/20/22 कलमे लावून गुन्हा दाखल करावा व त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावे या मागणीचा विचार न केल्यास मोठ्या स्वरुपाचे आंदोलन करणार आहोत व त्यात होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील. तसेच चंद्रकात पाटील यांच्यावर शाही फेकून रोष व्यक्त करणाऱ्या समता सैनिक दलाचे कार्यकर्ते यांच्यावर जीवे मारण्याचे कलम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ते कुठेही कायद्याला अनुसरून नाही त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदाद्वारे केली आहे.
निवेदनवर सह्या मंगल तेलंग,किशोर मून, बुद्धाय लोणारे, वैशाली गायकवाड, अर्चना कांबळे, नंदिनी ठमके, ललिता तेलतुंबडे, मिलिंद पाटिल, टेकचंद लभाने, किर्ती लभाणे, नलिनी थोरात, सुभाष परचाके, पुंडलिक मोहितकर, नानाजी लाडे, प्रकाश भाऊ, अक्षय रामटेके, रोहित डोंगरे ,गणेश चहारे यांचा आहेत.