•धोपटाळा येथील घटना.
•गावातील मध्यभागातच ‘उघडी विहीर’कशी हो सचिव सरपंच साहेब? विहीर संरक्षण कवच उपाययोजना गेल्या कुठे तुमचा…….!
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यातील धोपटाळा येथील गावात मध्यभागीच असलेल्या मोठ्या उघड्या विहिरीत तरुण ३० ते ३५ फूट पाणी असलेल्या खोल विहिरीत पडला व खोल तळाशी गेला. चेतन शंकर घोसरे (वय २५वर्ष) रा. धोपटाळा विहिरीत बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मॄतक चेतन शंकर घोसरे (वय २५ वर्ष)रा. धोपटाळा पो स्टे वणी मॄतक हा काल संध्याकाळी गावातच असणाऱ्या विहिरीवर नेहमीच बसायचा असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. परंतू काल रात्री 7 वाजता मृतक चेतनचा अचानकपणे तोल गेला की त्याने आत्महत्या केली. हा पोलीस चौकशीची बाब आहे. विशेषता त्या मृतकाची चप्पल त्या उघड्या विहिरीजवळ पडलेल्या अवस्थेत पाहून गावात आरडा ओरड सुरू झाला.त्यातच घरच्यांनाही ही बाब कळताच नातेवाईकही घटनास्थळ जवळ येइपर्यंत त्या चेतनचा दर्दैवी मृत्यू झाला होता. लगेच ह्या घटनेची माहिती रात्री जवळपास 8 वाजता पोलीस स्टेशन वणीला माहिती दिली व पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले व शेवटीं शवविच्छेदनंतर शव नातेवाईकांना देण्यात आले.
दरम्यान या अपघाती घटनेनंतर अन्य उघड़या व धोकादायक विहीरिंचा गंभीर प्रश्न समोर आला. भविष्यात विहिरीत पडून होणाऱ्या अपघाती घटना टाळण्यासाठी व सुरक्षीततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी खमंग चर्चाही धोपटाळा गावातून आता होऊ लागली, गावच्या मध्यभागात विहीर तेही उघड्या स्वरूपाची त्यात संरक्षण कवचही नाही मग आजपर्यंत सरपंच व सचिव निद्रावस्थेतच होते काय? हा ही प्रश्न अनुत्तरीतच..
“गावातील विहिरीला कठळा आहे.पण जाळी नाही कारण त्यात विहीरीत पडण्यासारखं अस काहीं नाही अशी अधिकृत माहीती ग्रामपंचायत सचिव जाधव यांनी दिली.”
“विदर्भ न्यूज प्रतिनिधीने सरपंच धनपाल चालखुरे यांना माहिती विचारली असता त्यांनी असे सांगीतले की,” मी तर सरपंच नवीन आहे. मला या विहीर संरक्षण कवच का लावले नाही याबाबत माहिती अपूर्ण आहे.”