•वणी विधानसभा काँग्रेस कमिटीचा कार्यक्रम यशस्वी संपन्न.
अजय कंडेवार,वणी:– गांधी ही एक व्यक्ती नसून,विचार आहे.समाजात त्यांच्याविषयी पराकोटीचा अप्रचार करीत द्वेष पसरविण्यात आला. त्यांचे विचार व जीवनशैलीची टिंगलटवाळी करण्यात आली. मात्र, त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. जगाच्या कल्याणाकरिता त्यांची गरज आहे. गांधी विचार मजबुरीचे नव्हे; तर सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेड़े यांनी वणी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित शेतकरी मंदीर येथे ता.8 ऑक्टोबर , सोमवार रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे हे होतें. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव कासावार होतें तसेच मंचावर उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नरेंद्र ठाकरे,आशिष खुलसंगे(झरी काँग्रेस तालुका अध्यक्ष), वंदना आवारी (म.जि.काँ.अध्यक्ष)उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा, संचालन वणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम पावडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मानले.
चंद्रकांत वानखेड़े पुढे म्हणाले, एका विशिष्ट विचारसरणीने गांधींविषयी द्वेष पसरवीत त्यांची हत्या केली. मात्र, त्यांच्या हत्येनंतरही गांधी विचार संपुष्टात आला नाही. विसाव्या शतकातील जागतिक महापुरुषांच्या यादीत त्यांचे नाव अग्रक्रमाने आहे. १४६ देशांत त्यांचे पुतळे आहेत, १६७ देशांत त्यांच्या नावावर टपाल तिकिटे काढण्यात आली. गांधी या व्यक्तीची हत्या करण्यात आली, तरी त्यांचे विचार अजरामर आहेत. ते मिटविणे शक्य नाही. जगाचा कल्याणाकरिता त्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांचा हस्ते स्वागत व सत्कार समारंभ घेण्यात आले त्यात माजी आ. वामनराव कासावार यांनी कार्यक्रमाचे गांधी विचारांचे प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांच्या स्वागत व सत्कार केला तर मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांचाही भारतीय संस्कृती पद्धतीनें सत्कार करण्यात आला.