•संजय खाडे यांनी राबविला कौतुकास्पद उपक्रम.
अजय कंडेवार,वणी:- स्वतःच्या खिशाला कात्री लावून गरजूसाठी मदत करणारे असंख्य हात या वणी शहरात आहेत. काही अनामिक राहून मदतीचे हात पुढे करतात. तर काही संस्था वसा घेऊन कार्य करीत आहेत. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्त्व जे सर्वांना परिचित असलेले रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांनी असाच एक कौतुकास्पद उपक्रम सुरू ठेवला .रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणी व श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. वणी यांचेमार्फत राष्ट्रीय विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगांव येथील गरजू विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून रंगनाथस्वामी अर्बन निधी लि.वणी चे अध्यक्ष संजय खाडे यांच्यातर्फे शालेय स्कुल बॅग चे वाटप केले.
याप्रसंगी रंगनाथस्वामी अर्बन निधी चे संचालक ईश्वर खाडे, लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था चे संचालक धनंजय खाडे, शाळेचे मुख्याध्यापक राजेशजी पोटे सर, शिक्षक चेतारामजी खाडे, संचालक पद्माकर एकरे, बी. एम. मोरे, शाळेचे सर्व शिक्षकवृंद, सर्व विद्यार्थी व बँकेचे कर्मचारी अनुराग आयतवार, प्रतिक गेडाम, सुहास लांडे, खुशाल महातळे आदि मोठया संख्येने उपस्थित होते.