Tuesday, July 15, 2025
Homeवणीगणेशोत्सवाच्या आनंदावर महागाईचे विरजण……

गणेशोत्सवाच्या आनंदावर महागाईचे विरजण……

• खर्चाला लगाम ,निर्बंधांशिवाय साजरा होणार उत्सव;

•आवश्यक वस्तूंची भाववाढ आवाक्याबाहेर.

अजय कंडेवार,वणी :– कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यावर्षी प्रथमच गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय मोकळ्या वातावरणात साजर होत आहे. घरोघरी गणरायांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची देखावे उभे करण्याची लगबग सुरु आहे. गणरायांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. आनंदाच्या या सणावर मात्र महागाईंचे विघ्न पहावयास मिळत आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे सण आणि उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यावर गेली दोन वर्षे कडक
होते. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून गेली दोन वर्ष गणेशोत्सवासह अन्य सार्वजनिक उत्सव साजरे केले जात होते. त्यामध्ये कोणताही उत्साह नव्हता. निर्बंध होते. आताही कोरोनाचे संकट पूर्णपणे गणरायांच्या संपले नसले तरी सार्वजनिक मूर्तीपासून ते कसे सण आणि उत्सवांवरील साजरे करायचे निर्बंध राज्यात नव्याने याच्यावर शासनाने सत्तेत आलेल्या सरकारने कडक निर्बंध लादले पूर्णपणे हटविल्याने मोकळेपणाने हा उत्सव साजरा करण्यात येणार असला तरी महागाईने त्यावर विरजण घातले आहे. तरीही
आधी वंदू तुझ मोरया….. म्हणत भक्तगण आले मूर्तीसाठी

पूजा साहित्याच्या किमती गगनाला :

आवश्यक वस्तूंची भाववाढ आवाक्याबाहेर गेली आहे. गणरायाच्या मूर्तीच्या किंमतीत वाढ झाली आहे. सजावट आणि पूजा साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गणरायाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फळांच्या किमती न परवडणाऱ्या ठरल्या आहेत. अर्थात या महागाईनंतरही गणरायांचे स्वागत उत्साहात आणि आनंदातच होणार आहे. सजावटीच्या साहित्याने महाडची बाजारपेठ सजली असली ग्राहकांकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही.

विदर्भ न्यूज…. ” प्रतिनिधीनी घेतलेली प्रतिक्रिया :-

” महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याचे दर वाढले आहेत. सजावटीचे साहित्य महागल्याने गतवर्षीचे साहित्यच वापरुन सजावट करावी लागणार आहे.”

  • – गणेशभक्त

“सजावटीच्या साहित्यावर जीएसटी आकारण्यात येत असल्याने ते महाग झाले आहे. त्यामुळे या साहित्याच्या खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळालेला नाही.”- विक्रेता.

” गणेशमूर्तीच्या विक्रीवर जीएसटी नसला, तरी मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर जीएसटी असल्याने मूर्ती महागल्या आहेत. अनेक गणेशभक्त त्यामुळे छोट्या आकाराच्या मूर्तीनाच पसंती देत आहेत.”

-मूर्तिकार

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments