•शिरपूर पोलिसांचा कामगिरीचा आलेखात वाढ.
अजय कंडेवार वणी:- गैंग रेप गुन्ह्यातील फरार आरोपी आशिक संदीप उराडे (रा. रामकृष्ण चौक, वानखेडे वाडी, तुकूम ता. जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. याला शिरपूर पोलिसांनी चारगाव चौकीतून काल (दि.20 ऑगस्ट) रविवारी रोजी सायंकाळी शिताफीने सापळा रचून त्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.Shirpur police performance increase in graph.
गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे.तसेच, बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील असणाऱ्या एका गावाजवळ असणाऱ्या अज्ञात ठिकाणचा रूमवर नेऊन तिघांनी मिळून आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना दि.19 ऑगस्ट रोजी समोर आली होती. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला होता. या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत दुर्गापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते.परंतु त्यातील एक आरोपी आशिक संदीप उराडे (रा. रामकृष्ण चौक, वानखेडे वाडी, तुकूम ता. जि. चंद्रपूर) हा फरार असल्याने चंद्रपूर पोलिस त्याचा कसून शोध घेत होते.तितक्यातच या गुन्ह्यातील फरार आरोपी हा शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसला असल्याची माहिती काल दि.20 ऑगस्ट रविवारी दुर्गापूर पोलिसांना मिळाली व त्यावरून चंद्रपूर पोलिसांनी शिरपूर ठाण्यातील ठाणेदार गजानन करेवाड यांच्याशी संपर्क साधून या कुख्यात फरार आरोपीचे ‘लोकेशन’ सांगून त्याला ताब्यात घेण्याचे सूचित केले.लगेचच क्षणाचा विलंब न करता शिरपूर पोलिसांनी चारगाव परिसरात सापळा रचला.गँग रेपचा फरार आरोपीला शिताफीने शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळले. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक शिरपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले.त्यानंतर आरोपीला चंद्रपूर पोलसांचा ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई सदरची कार्यवाही डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ),पियुष जगताप (अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ), गणेश किंद्रे (उप.वि.पो.अ.वणी) यांचा आदेशाने शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद मोतेराव, अमित पाटील यांनी केली.