•”या..’ सात वचनांचे केले स्मरण
अजय कंडेवार,वणी:- राजूर येथील फ्री मेथॉडिस्ट चर्च येथे आज (शुक्रवारी,दि.7 एप्रिल) ख्रिश्चन बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्तांची भावपूर्ण वातावरणात उपासना केली. भाविकांनी चर्चमध्ये दुपारी 12 ते 3 या वेळेत उपासना केली. गुड फ्रायडेच्या उपासनेत येशू ख्रिस्तांनी वधस्तंभावर उच्चारलेले ‘सात शब्द’ भाविकांकडून उच्चारले जातात.Christian brothers worshiped Jesus Christ in emotional atmosphere. “Come..” Remembered the seven verses
गुड फ्रायडे या ईस्टर संडेच्या अगोदर येणा-या शुक्रवारी असतो. येशू ख्रिस्तांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ख्रिश्चन भाविक गुड फ्रायडेला येशूची उपासना करतात. आजच्या दिवशी ख्रिश्चन बांधव दान, धर्म करतात. रोम राजाच्या आदेशाने येशूला शुक्रवारच्या दिवशी वधस्तंभावर चढवण्यात आलं. अंधविश्वास पसरवणा-या धर्मगुरूंनी कान भरल्याने रोम राजाने हा निर्णय घेतला. येशूने जगाला प्रेम आणि करुणेचा संदेश दिला आहे. येशूने आपले संपूर्ण जीवन दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केले.
शुक्रवारी फ्री मेथोडिस्ट चर्चमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुड फ्रायडेची चर्चमध्ये उपासना करायला मिळत असल्याने अनेकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. यावेळी चर्चमध्ये पिण्याच्या पाण्याची , भाविकांसाठी लस्सीची भाविकांना प्रार्थनेची सोय करण्यात आली..
यावेळी फ्री मेथॉडिस्ट चर्चची कोर कमिटीचे अध्यक्ष पास्टर गिरीष शिरमनवार सचिव डेविड पेरकावार ,खजिनदार प्रकाश तालावार , सरपंच विद्या पेरकावार, मोजेस कोमलवार, बाबू कुक्कलवार, प्रवेश तालावार अब्राहम कलवलवार ,शाम संगमवार,पेतरस पारखी,समुवेल येलपुलवार, विनोद तांड्रा, अजय कंडेवार, समस्त समाजबांधव होते.
गुड फ्रायडेच्या दिवशी येशूने वधस्तंभावरून • उच्चारलेल्या “सात शब्दांचे” स्मरण केले जाते. येशूने उच्चारलेले सात शब्द असे आहेत –
1.येशूचा पहिला शब्द– हे बापा, त्यांना – क्षमा कर. कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.
2.येशूचा दुसरा शब्द –मी तुला खचित – सांगतो. तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.
3.येशूचा तिसरा शब्द- बाई, पहा हा तुझा मुलगा. पहा ही तुझी आई.
4.येशूचा चौथा शब्द– एलोई, एलोई लमा सबक्थनी ? म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ?
5.येशूचा पाचवा शब्द – मला तहान लागली आहे.
6.येशूचा सहावा शब्द– पूर्ण झाले आहे.
7.येशूचा सातवा शब्द – हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.