•पोलिसांचा कार्याला “त्या “नातेवाईकाने केले “सँल्युट ”
अजय कंडेवार,वणी :- कोण म्हणतं खाकी वर्दीतल्या माणसाला माणुसकी नसते, कोण म्हणतं तो भावनाशून्य असतो? खाकीतला पोलीसही एक माणूसच असतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यालाही भावना असतात आणि त्याच्याही मनाचा एक कोपरा हळवा असतो. प्रत्येक वेळी गुन्हेगारांना वठणीवर आणणारे आक्रमक पोलीस आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. पण याच पोलीस दादांनी केलेल्या सामाजिक कामामुळे देखील खाकी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार……. शिरपूर पोलिस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे वाट चुकलेल्या “तो” सुखरूपपणे त्याचा नातेवाईकांसबोत रवाना केल्याने खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडले. शेवटी पोलीसांनी चालत्या वाटेत यात लक्ष घातल्याने “तो “सुखरूप घरी पोहोचला आहे.
सविस्तर, गणेशोत्सवनिमित्त शिरपूर पोलिसांचा ताफा कायर गावात पेट्रोलियमकरीता दाखल झाला.तेव्हढ्यात पोलिस कर्मचारी अनिल सुरपाम व त्यांची चमू यांना एक मळकट कपडे घातलेला आणि नकोसा वाटणारा व त्याची तब्येत हलवलेली… असा एक व्यक्ती निदर्शनास आला. त्याजवळ शिरपूर पोलिस कर्मचारी गेले असता त्याला त्या परिस्थितीत पाहून माहिती घेत असताना त्याची भाषा कोणालाच न समजणारी. पण तेलगू भाषेत काहीतरी बडबड करत होता त्याचा तेलगू भाषेवरून हा तेलंगणा किंवा आंध्र राज्यातील असावा असा अंदाज लावला.
शिरपूर ठाणेदार संजय राठोड यांनी त्यांचा जवळील तेलंगणा पोलिसांसोबत संपर्क साधला व शिरपूर स्टेशन मध्ये हा अनोळखी व्यक्ती आहे व मोबाइल नंबर देखिल दिला. या अनोळखी व्यक्तीचा फोटोही पाठविला. त्या तेलंगाना पोलीसांनी तेलंगाना भागातील पोलिस विभाग व तेथील समाज माध्यमावर(सोशल मीडिया) वर फोटो प्रसारित केला असता, अवघ्या एका तासात त्या इसमाच गावातील “अनमकोंडा” जिल्ह्यातील एका सरपंच यांचा शिरपूर ठाणेदार यांना फोन आला व त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शिरपूर पोलिसांकडे असणारा हा धर्मपूरम या गावातील आहे.त्याचे पूर्ण नाव मेहकला रमेश परमया (वय 45 वर्ष) रा.धर्मपुरम ता.धर्मसागर ,जिल्हा अनमकोंडा, तेलंगणा राज्य असे असून 400 किमी दूरवरचा आहे. तो मागील 2 महिन्यापासून घरून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना देखील तो मिळाला नव्हता. असे त्या मोबाइलचा माध्यमातून सांगितले व गावातून लगेच नातेवाईकांना रवाना करून ताब्यात घेण्याकरिता पाठवत आहोत तोपर्यंत त्याची काळजी घ्या अशी तेथील सरपंच यांनी विनंती ठाणेदार संजय राठोड यांना केली.शिरपूर पोलिसांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे भरती करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले व दि. 23 सप्टें.रोजी त्याचे नातेवाईक राजू दासरी गठैया (मामा), भोलाबाईना हरीकिसन (मेहुना) हे खाजगी वाहनाने कायर येथे आले व ते नातेवाईक शिरपूर पोलीसांना भेटले त्यानंतर पोलिसांनी देखील खात्री करून या व्यक्तीस नातेवाईकांचा ताब्यात दिले.त्याला त्याची पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार असून सर्व जण त्याच्या शोधात होते. शेवटी तेव्हा त्यांनी महाराष्ट्र पोलिसाबद्दल खूप कृतज्ञता व्यक्त केली.
सदरचे कार्य गणेश किंद्रे साहेब यांचे मार्गदर्शनात शिरपूर ठाणेदार API संजय राठोड यांचा सूचनेने PSI रामेश्वर कांडुरे,बीट अंमलदार अनिल सुरपाम, अभिजीत कोशटवार, राजन इसंनकर यांनी केली.