•मुकुटबन ग्रा.प.सरपंच मीना आरमुरवार व गावकऱ्यांची मागणी
वणी :- झरी तालुक्यातील मुकूटबन ग्रामपंचायतला खनिज विकास निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच जड वाहतुकीकरीता बायपास मार्ग सुरू करण्यसाठी ग्रामपंचायत सरपंच व गावकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदनातून साकडे घातले आहे.
आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक असलेली सिमेंट कंपनी झरी तालुक्यातील मुकूटबन नगरीत आहे. या ठिकाणी कोळसा खाणी आहेत. आतापर्यंत खनिज विकास निधीतुन एकही काम मंजूर झाले नाही ,तेव्हा जास्तीत जास्त खनिज विकास निधी मुकूटबन गावासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. जेणेकरून गावाच्या विकासासाठी मदत होईल तेव्हा या विषयाकडे लक्ष देऊन मुकूटबन गावासाठी जास्तीत जास्त खनिज विकास निधी उपलब्ध करून देण्यात यावां तसेच मुकूटबन गावच्या आजुबाजूला कोळसा अनेक खाणी आहे परंतू त्यामुळे अनेक जडवाहतुक मुकूटबन गावाच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते ,त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
तेव्हा अश्या या जड वाहतूकीसाठी गावाच्या बाहेरून बायपास मार्ग सुरू करण्यात यावी अशी जोरदार मागणी निवेदनातून गावकऱ्यांनी केली आहे.