अजय कंडेवार, वणी:- क्रेडाई अर्थात कॉफिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.देशपातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी व ग्राहकांना दर्जेदार सुविधा देणारी संघटना आहे.यात प्रत्येक दोन वर्षांनी निवड होत असते.यंदाची ही निवड २०२३ ते २०२५ या दोन वर्षांसाठी असणार आहे. विशेषतः वणी “क्रेडाईच्या” अध्यक्षपदी किरण दिकुंडवार तर सचिवपदी संजय निमकर उपाध्यक्ष पदी विवेक ताटेवर तर खजिनदारपदी मनीष चौधरी यांची फेर नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२८ जुलैला हॉटेल V9 मध्ये करण्यात आली.Kiran Dikundwar as President of “Credai” Wani and Sanjay Nimkar as Secretary..
देशातील २१ राज्यात क्रेडाईचे काम सुरु असून महाराष्ट्रात सध्या ६२ शहरामध्ये हि संघटना कार्यरत आहे. बांधकाम व्यावसायिकांना एकत्र आणून त्याच्या समस्या सोडवण्या बरोबरच वणीकरांना निवासाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, त्याच बरोबर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणे हा क्रेडाई वणी चा मुख्य उद्देश आहे.
“माझ्यावर “क्रेडाई” वणी अध्यक्षपदाची जबाबदारी विश्वासाने सोपवली आहे. हा विश्वास सार्थ ठरवणारे काम करण्याचा प्रयत्न राहील. या पदाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचे व ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल.”- (किरण दिकुंडवार,वणी बिल्डर्स & डेव्हलपर्स असोसिएशन).
नवीन वणी कार्यकारणी गठीत……..
“अध्यक्ष -किरण दिकुंडवार, सचिव- संजय निमकर, उपाध्यक्ष- विवेक ताटेवार, खजिनदार- मनीष चौधरी
मॅनेजिंग कमिटी सदस्य- राजेश झिलपिलवार, रमेश सुंकूरवार, संजय कोडगीवार, राम पोदुतवार, विजय चोरडिया, सुनील देरकर, सुनील कातकडे, निलेश कटारिया, मनीष कोंडावार, अनिल उत्तरवार, अशोक भंडारी, सुशील मुथा, दामोधर देठे, शैलेश तोटेवार, श्रीकांत गारघाटे, जमीर खान, देवराव भगत, संजय पोटदुखे, निकेत गुप्ता, विनोद खुराना, आशिष काळे, केतन गुंडावार, विवेक पांडे, सुहास गटलवार, राजू विराणी, अजिंक्य मत्ते, सुधीर गाडगे, बंटी कोठारी, सुधीर चोरडिया, जय आबड, हितेन अटारा, अनुज मुकेवार, संदीप जयस्वाल, आचल जोबनपुत्रा, सुरज महातळे, निखील केडीया, राहुल कुचनकर, पंकज गुप्ता, साहिल सलाट.”