Tuesday, July 15, 2025
HomeBreakingक्रिकेट सट्टयावर धाड, दोन अटकेत

क्रिकेट सट्टयावर धाड, दोन अटकेत

•डी.बी पथकाचा दणका..

अजय कंडेवार,वणी:- शहरात रंगारीपुरा येथे सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) खेळणाऱ्या दोन जणांना वणी डीबी पथकानी अटक केली आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून 4 नग मोबाईल, लॅपटॉप, LED टि.व्हि. व इतर जुगाराचे साहित्य असा एकुण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 3 मार्च रोजी रात्री 10.55 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

दि. 3 मार्च रोजी पाकीस्तान सुपर लीग सीजन 2023 क्रिकेट मालीकेमधील कराची टिम विरुध्द इस्लामाबाद असलेल्या सामन्यावर बॅटिंग सुरु असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळाली होती. या माहितीवरून पो.नि.प्रदिप शिरस्कर पोउपनि आशिष झिमटे यांनी पोलीस स्टाफसह रात्री 9 वाजता रंगारीपुरा येथे खोलीत धाड टाकली असता त्यावेळी दोन व्यक्ती राजेश्वर सुरेश चापडे (वय ३५ वर्ष), रंगनाथ नगर ,शिवा भारतभूषण शर्मा(वय २८ वर्ष ) रंगारीपुरा हे मोबाईलवर बेटिंग करताना आढळून आले. यांचाकडून एकुण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींवर पोलीस स्टे. वणी जुगार कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपींना पुढील कार्यवाही करीता ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही डॉ.पवन बन्सोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी यांचा मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि.प्रदिप शिरस्कर यांनी व डी.बी. पथकचे पोऊनी आशिष झिमटे, एएसआय सुदर्शन वानोळे ,डोमाजी भादीकर, सुहास मंदावार,हरीन्द्रकुमार भारती पोकों/सागर सिडाम,सुभम सोनुले, पुरूषोत्तम डडमल, छाया उमरे यांनी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments