•भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांच्या पुढाकार.
•परीसराचा विकास साधता यावा याच उद्देशाने नेहमी अग्रेसर.
अजय कंडेवार,वणी:- यवतमाळ व चंद्रपूर जिल्हयातील वणी ते कोरपना राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून चौपदरीकरण करण्याकरिता वैभव कवरासे (जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ भाजयूमो) यांनी दि.29 ऑगस्ट रोजी निेवेदनाद्वारे मागणी करीत नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाज बांधणी मंत्री) यांना साकडे घातले आहे.Give Korpana-Wani road the status of National Highway…..!
चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोरपना ने वणी हा ४२ कि.मी. चा राज्य महामार्ग आहे. यातील वणी ते चारगांव चौकी (१० कि.मी.) हा करंजी वणी. घुग्घुस या प्रमुख राज्य महामार्गाला जोडला असल्याने त्याचे चौपदरीकरण होवून सुस्थितीत आहे. परंतु चारगांव चौकी ते कोरपना हा ३२.कि.मी. व्या मार्गाची सध्या स्थिती अतिशय देवनावस्था झाली आहे. अलीकडेच वरोरा वणी या राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. हा महामार्ग कोरपनापर्यंत थेट जोडणारा असल्यामुळे या राज्यमहामार्गाला सुध्दा राष्ट्रीय महामार्गात परावर्तीत करून चौपदरीकरण करण्यात यावे.
सदर राष्ट्रीय महामार्ग झाल्यास कोरपना परिसरातील सिमेंट, कोळसा, जिनींग प्रेसीग उद्योगांना वणी परीसरातील गिट्टी खदानीच्या जड वाहतुकीसाठी कोरपना पासून नागपूर १७२ कि.मी. पर्यंतचा दोन्ही जिल्हयातील सर्व नागरीकांना प्रवास करण्यासाठी सुखकर व सोईचा होईल. तसेच वणी येथून वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० व कोरपना येथून राजूरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी ला जोडल्या गेल्यामुळे या परीसराचा विकास साधता येईल.या उद्देशाने वैभव कवरासे (जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ भाजयूमो) यांनी निेवेदनाद्वारे नितीन गडकरी (केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाज बांधणी मंत्री) यांना साकडे घालत मागणी केली आहे.