•नविन GR काढून प्रती हेक्टर १३,६०० मदत द्या .
•मा.जि.प.सदस्य पिदुरकर हे शेतकऱ्यांचा हिताचे ज्वलंत प्रश्न मांडण्यात उपविभागात अव्वल.
अजय कंडेवार वणी:- अतिवृष्टी आणि सततच्या पावसानं (Rain) यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांनी दिवाळी सण व दैनंदिन गरजा कशा पुर्ण करीत आहे हे त्यांनाच माहीत असून त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे यातही राज्य शासनाने बागायत क्षेत्रासाठी १७ हजार तर विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपयांची नैसर्गिक आपत्ती मदत जाहीर केली आहे. परंतु मराठवाड्यातील बागायतदारांना कोरडवाहू क्षेत्राचीच आजपर्यंत आपत्ती मदत मिळालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का,असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.याच मुद्यावरुन शेतकऱ्यांसाठी नविन GR काढून प्रती हेक्टर १३ हजार ६००रु मदत द्यावी या मागणीचे निवेदन ता. १० नोव्हें. रोजी माजी जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांनी SDO वणी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे.
यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत नदी नाल्यांना आलेल्या महापुरात कापूस, सोयाबीन, तुर, मिरची ईत्यादी पिके पूराचे पाण्यात सडून नष्ट झाली. तसेच शेतजमीन खरडून गेली. या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य शासनाने बागायत क्षेत्रासाठी १७ हजार तर कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपयांची नैसर्गिक आपत्ती मदत जाहीर केली आहे. परंतु मराठवाड्यातील बागायतदारांना कोरडवाहू क्षेत्राचीच आजपर्यंत आपत्ती मदत मिळालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग विदर्भातील शेतकऱ्यांसोबतच दुजाभाव का,असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्या करीता हंगाम २०२३ मध्ये नविन G.R काढून लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी १३, ६००रू मदत द्या. अशी रास्त मागणी करण्यात आली आहे.
मदतीसाठी अट काय ?
“१.शेतीपिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीची पिके कोरडवाहू क्षेत्रासाठी ८५०० रुपये प्रतिहेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादित कमीत कमी अनुज्ञेय मदत एक हजारापेक्षा कमी नसावी,
२.आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्र प्रतिहेक्टर १७ हजार रुपये तर कमीत कमी अनुज्ञेय मदत दोन हजारापेक्षा कमी नसावी. ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झाल्यास दोन हेक्टर मर्यादित मदत अनुज्ञेय राहील.
३.बहुवार्षिक पिके प्रतिहेक्टरी २२,५०० रुपये मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिता अनुज्ञेय असून, कमीत कमी २,५०० पेक्षा कमी असणार नाही.”