कोई कितना भी कर ले खोट….”गाव विकास परिवर्तन पॅनल” को ही हैं वोट……!!!!!
• ‘राकेश”देणार विरोधकांना टक्कर…
अजय कंडेवार,वणी – तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 18 डिसेंबरला होऊ घातली आहे . यामध्ये परिसरातील अतिशय महत्वपुर्ण ग्रामपंचायत कायर आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे . या गावा शेजारील पठारपूर हे गाव माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे असल्याने कायर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
कायर निवडणुकीत सर्वच प्रमुख विविध पक्षांनी उमेदवार दिले आहेत. काहीं अंतर्गत धुस्फुसिमुळे येथे शिवसेनेच्याच काहींनी बंडखोरी केली व तीन पॅनल तयार झाले. त्यातच सरपंच पदाचे अधिकृत व तडफदार उमेदवार राकेश विठ्ठल शंकावार यांना आपल्या परिवर्तन पॅनेल विजयी संधी आहे. कारण शिवसेनेचा एकनिष्ठ” विश्र्वास “चा विश्र्वास जिंकणारा एकमेव “राकेश “यांनी ठाकरे गटाचा वतीने सरपंच नामंकन केले .त्यामुळे येथील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. विशेषतः “एका पॅनलचा” उमेदवार तर दावे करीत आहे की, मला कोणाचा पाठिंबा नाहीं मग त्या उमेदवाराला आत मधून पाठिंबा आहे का ? अशीही खमंग चर्चा आहे. मग समस्तबॅनर खर्च व सदस्याचा कर भरणा खर्च कुठून केला ? हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.मग कस म्हणाता हो साहेब पाठिंबा मला कोणाचाच नाही? यावरूनच असे स्पष्ट मतदारांना लक्षात येत आहे की खोट्या आश्वासनांचा नावाखाली मतदाराची फसवणूक करीत मते मागण्याचा बाजार गावात सुरू असल्याची चर्चा ही सुरू आहे .
कायर गावात असेही बोलल्या जात आहे की, अपक्षाचा काही पक्ष तर नाहीं ना ? यातही काही राजकारणी खेळी तर सूरु नाहीं ना? म्हणून मतदारांनी कोणत्याही लोभाला बळी न पडता गाव विकास करणारा सरपंच उमेदवारच निवडण्याचे आवाहन असल्याचं बोलल्या जात आहे.त्याकरिता मतदार राजा लावेल यांचा निकाल ……?