•6 गुन्ह्यांचा लागला छडा.
अजय कंडेवार,वणी :- चोरीच्या अॅल्युमिनीयम ताराची विल्हेवाट लावण्यासाठी निघालेला चोरट्यास बेड्या ठोकण्यात आल्या. वणी, मारेगांव, शिरपुर, राळेगाव, वडगांव जंगल पो.स्टे. हद्दीतुन तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी करताच ठिकठिकाणावरून चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यावरून ७ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करुन ०६ गुन्हे उघडकीस आणले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली.
सैय्यद अब्दुल अली, वय ४४ वर्षे, रा. फुकटवाडी गुरु नगर वणी. ता. वणी जि. यवतमाळ ह.मु. खान साहाब प्लॉट खिडकीपुरा नेर ता. नेर जि. यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. दि 20 सप्टेंबर रोजी LCB ने वणी परसिरात बंदोबस्त असताना माहितीचा आधारे एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा अॅल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टि पॉईन्ट वरून वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने घोन्सा टि पॉईन्ट वणी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे एका टाटा सुमो वाहनास थांबवुन त्याचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता विद्युत वाहीनीचे तार तुकडे केलेले ०६ बंडल किमंत अंदाजे ७९ हजार रु तार कापण्या करीता उपयोगात येणारे मोठे कटर कि. अ. ५,००० रु. दोन ऑक्सीजन सिलेंडर व त्याचे उपयोगाकरीता लागणारे पाईप नोजल असे एकुण कि.अ. २५,०००/- रु, असा एकुण १,०९,००० / रु कितीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास विद्युत तारांबाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता ,त्याने तार ही दोन दिवसांपूर्वी त्याचे दोन साथीदार अनिल यमुलवार, दिनेश मेश्राम यांचेसह मिळुन कायर जंगल परिसरातुन कटरचे सहाय्याने तोडली असल्याचे व सदरची तार तोडुन छोटे तुकडे करुन लपविण्यासाठी वणी येथे नेत असल्याचे सांगीतले. तार व केवल चोरी संबधाने बरेच गुन्हे यापुर्वी नोंद असल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने व त्याचे दोन साथीदार यांनी मिळुन नरसाळा ता. मारेगांव व यवतमाळ घाटंजी रोडवरील कोळंबी सं जंगलातून तसेच गणेशपुर ,वणी, राळेगांव शहर परिसरात सुध्दा तार व केबल चोरी केली असल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, भोजराज करपते, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सुधीर पांडे सतीष फुके, नरेश राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.