अजय कंडेवार,वणी :– केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी कार्यशाळा जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा,गणेशपूर येथे दि.20 एप्रिल 2023 गुरूवार रोजी आयोजित करण्यात आले. ही कार्यशाळा अतिशय उत्साहपूर्वक संपन्नही झाली.Central level school pre-preparation in excitement..The aim of this activity is to facilitate the transition of children to class 1st.
शिक्षण विभाग २०२३-२४ शैक्षणिक वर्षातही शाळापूर्व तयारी अभियान सुरू आहे. पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी हे पाऊल यंदाही महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शाळानिहाय माता-पालक गट तयार करण्याबाबत शिक्षण विभागाकडून हालचाली देखील सुरू आहे.इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करणे व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या वर्गात बालकांचे सहज संक्रमण घडून येणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ज्या बालकांची शाळापूर्व तयारी चांगली झालेली असते. ती बालके औपचारिक वाचन, लेखन, गणन या मूलभूत क्षमता सहजगत्या प्राप्त करतात, असे आढळून आल्याचे सांगण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार बोदकुरवार यांनी केले ,अध्यक्षस्थान संजय पिंपळशेंडे (माजी सभापती पंचायत समिती वणी) प्रमुख अतिथी म्हणून किशोर गज्जलवार (गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी),आशा जुनगरी (सरपंच ग्रामपंचायत गणेशपूर) सुनील काळे (अध्यक्ष शा.व्य.समिती, गणेशपूर) एन.एन.बोबडे (केंद्रप्रमुख चिखलगांव) मुख्याध्यापिका विणा पावडे गणेशपूर, विनोद नासरे (गटसाधन केंद्र वणी)राजेश घोनमोडे, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी सेविका,स्वयंसेवक उपस्थित होते.तज्ञमार्गदर्शक म्हणून प्रकाश तालावर व अमृता टोंगे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळचे संचालन प्रतिमा खडतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेखा पिदुरकर यांनी केले.ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरीता आवारी तिरपुडे,वासेकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी प्रयत्न केले.विशेष या कार्यशाळेत 34 शिक्षक व 12 अंगणवाडी सेविका उपस्थित होते.