अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील कृष्णानपुर येथे नुकतीच शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या गावात लोकवर्गणीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळयाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गावात विविध जनजागरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात समाज प्रबोधनकार म्हणून आकाश टाले नागपुर यांचे ग्रामविकास, स्वच्छता व व्यसनमुक्ती वर प्रबोधन झाले.
याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुषमा जुमनाके (सरपंच ग्रा.पं. कृष्णानपुर) या होत्या. तर उद्घाटक म्हणून संजय खाडे (अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी तथा संचालक वसंत जिनींग अॅण्ड प्रसिंग फॅक्टरी वणी) प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश ठावरी तसेच उप पोलिस निरीक्षक अनिल देरकर, संदिप ठावरी, संतोष कातकडे, देविदास ठावरी ,दुर्वास महाकुलकर, अमोल ढेंगळे, जिवन जेउरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी संचालन शुभम राउत यांनी तर आभार प्रदर्शन सुहास लांडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर लांडे माजी सरपंच कृष्णानपुर यांनी पुढाकार घेउन हा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडला.•