•धक्कादायक प्रकार उघड.
अजय कंडेवार,वणी :- वणी:- शेतकऱ्याचे पीक काढणीला आले असून पिकास योग्य भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे काढणी झालेले पीक साठवण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत तारण गोदाम देण्याची योजना बाजार समिती मार्फत अस्तित्वात आहे.
शेतीमालाची साठवणूक करून बाजारभावात सुधारणा झालेली असताना विक्री केल्यास फायदा होतो. म्हणून मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार हे निवेदन घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गेले असता धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आला की, शेतकऱ्यांकरिता राखीव असलेले तारण गोदाम शेतकऱ्यांना न देता व्यापाराच्या घशात घालण्याचा प्रकार वणी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत करण्यात आला आहे. सात तारण गोदामापैकी तीन गोदामात व्यापाऱ्यांचा माल साठवून असून उर्वरित तीन गोदामात मागील वर्षीच्या शेतकऱ्यांचा माल साठवून आहे असे अधिकाऱ्यांमार्फत बाजार समितीच्या सांगितले.
प्रत्यक्ष तालुकाध्यक्षांनी गोदाम उघडून बघितले असता ते संपूर्ण गोदाम हे रिकामे होते. म्हणून तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी चांगलाच राडा बाजार समितीमध्ये केल्याचे दिसून येत आले. येत्या चार दिवसात संपूर्ण गोदाम रिकामे करून शेतकऱ्यांकरिता मोकळे करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.