•डॉ.महेंद्र लोढा नेतृत्वात वणी काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले.
अजय कंडेवार, वणी:- महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना.धंनजय मुंडे यांनी वणीला डॉ. महेंद्र लोढा यांचा निवासस्थानी बुधवार ता. 3. जाने 2024 रोजी सदिच्छा भेट दिली. अनेक दिवसांपासून कृषिमंत्री नामदार धंनजय मुंडे यांच्या मनात होते की, वणीत असलेला जिवलग मित्र डॉ. लोढा याची भेट घ्यावी, ती आज पूर्ण झाली. ही सदिच्छा भेटच होती. यावेळी डॉ. लोढा दाम्पत्यानी पूष्पगुच्छ देत स्वागत केले. ना. मुंडे यांनी डॉ. लोढा परिवाराशी चर्चाही केली. Agriculture Minister Dhanjay Munde’s Dr. Goodwills visit to Lodha’s residence at Wani
वणी काँग्रेस कमिटीने देण्यात आलेल्या निवेदनात समस्त शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, पुरबुडी ,ओल्या दुष्काळामुळे नष्ट झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी, दिवसाला रोज 10 तास वीज देण्यात यावी, कापसाला 12 हजार रु प्रति क्विंटल, सोयाबीनला 8 हजार रु, तुरीला 13 हजार रु. आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा तसेच जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता तारकुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली
सदर निवेदन डॉ. महेंद्र लोढा यांचा नेतृत्वात जेष्ठ नेते जयशिंग गोहोकार, वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, राकेश खुराणा, जय आबड, अशोक पांडे,तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
वणी काँग्रेस निवेदन देताना टिपलेले क्षण…...