•जनतेतून निवडून आलेला थेट सरपंच अपात्र.
•तालुक्यात पहिलीच घटना तेही एक ऐतिहासिक गावात.
•”मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन” अशी आर्त हाक…….?
अजय कंडेवार,वणी:- कायर ग्रामपंचायत सरपंचपदाचा प्रभार उपसरपंचाकडे सोपविण्यात आला आहे. या शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा दणक्याने सरपंचांना अपात्र ठरविण्यात आल्याने रिक्तपदाचा प्रभार उपसरपंचाकडे दिं 11 डिसें.रोजी करण्यात आला आहे. तालुक्यातील कायर ग्रामपंचायतमध्ये सरपंचाविरुद्ध गावातीलच नौशाद शेख यांनी तक्रार तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय अमरावती पर्यंत इतर बाबतही तक्रारी करण्यात आल्या. त्या आधारे यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी यांनी दि.24 नोव्हेंबर रोजी देत सरपंच याला स्पष्ट अपात्र घोषित केले.
गट विकास अधिकारी पंचायत समिती ,वणी यांनी ग्राम पंचायत कायर येथील सरपंच यांना पत्रानुसार संदर्भ क्र.2 अन्वये सदस्य व सरपंच या पदाकरिता अपात्र घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कायर येथील सरपंच पदच रिक्त झाले आहे. त्याकरिता ग्राम पंचायतचे कामकाज सुरळीत चालविण्याकरिता तसेच ग्रा.पं.चे प्रशासन सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने ग्राम पंचायत कायर येथील उपसरपंच यांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार निहीत करणे आवश्यक आहे. त्याकारण नागोराव मारोती धनकसार सरपंच ग्रामपंचायत कायर यांना पंचायत समितीतून थेट अपात्रतेचे पत्र मिळताच घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कायर येथील सरपंच यांचे सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार उपसरपंच यांना प्रदान करणे आवश्यक आहे. त्यामुळे दि.11 डिसेंबरपासून ग्राम पंचायत कायर येथील सर्व प्रशासकीय व आर्थिक अधिकारी उपसरपंच माया मोहूर्ले ग्राम पंचायत कायर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 38 (1) नुसार ग्राम पंचायत कायर येथील सरपंच पदाचे सर्व अधिकार प्रदान करण्यात आले.
गावतीलच काहीं समाजसेवकांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या सरपंच आपत्रतेकरिता केस दाखल करून सदस्य व सरपंच पद शेवटीं अपात्र केले. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र केले. त्यांच्या जागेवर उपसरपंच माया मोहूर्ले यांना सरपंचपदाचा प्रभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे थेट सरपंच यांना अपात्र केल्याची घटना वणी तालुक्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.