•मिरवणुकीत झाले गावात एकोप्याचे दर्शन..
अजय कंडेवार,वणी :- तालुक्यांतील कायर गावातील कोळी समाजाचा वतीने महर्षी वाल्मीकी जयंती उत्सव काल दि. 9 ऑक्टोंबरला उत्साहात साजरा करण्यात आला. या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त कायर गावात दिंडी व पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली . कोळी समाजबांधव यांच्या वतीने महर्षी वाल्मीकी यांची सवाद्य मिरवणूक ऋषींची पालखी काढण्यात आली.
वाल्मिकी रामायणाचे रचनाकार (the author of Ramayana) म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. ते आदिकवि म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातुन आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साह्स यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी (Jayanti of Maharishi Valmiki) असे सुद्धा संबोधले .
या जयंतीला महर्षी वाल्मिकी ऋषीं जयंतीत संपूर्ण गावभर मिरवणूक चे आयोजन करण्यात आले. मिरवणुकी मध्ये पूर्ण कोळी बांधव व गावातील बहुतांश लोकांनी सहभाग घेतला. बाल गोपाल ते वयोवृध्द सर्वांनी मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभाग घेतला व वाजत गाजत शांतीपूर्ण पद्धतीने जयंती साजरी केली. मिरवणुकीची सांगता झाल्या नंतर समस्त नागरीकाकरीता भोजनाची व्यवस्था करण्यात आली व जास्तीत जास्त नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी वाल्मिकी ऋषींच्या जयंती निमित्त आलेल्या सर्व माननीय, सन्मानिय व्यक्तींचे आभार मानले व जयंतीची सांगता करण्यात आली.