•महाआरोग्य शिबीराचा समस्त जनतेनी लाभ घ्यावे – डॉ. महेंद्र लोढा
•या शिबिराचा माध्यमातून ‘ संधीसाधू गावपुढारी झाले चार्ज. ..’
•संधी साधू गावपुढारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर “दिखावे मे है दम …हम ही हम ” दाखवित असल्याची खमंग चर्चा.
सुरेंद्र इखारे,वणी – वणी तालुका काँग्रेस कमिटी व शिवभक्त मंडळ कायर यांचे संयुक्त विद्यमाने व स्वास्थम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर यांचे सहकार्याने दिनांक 8 ऑक्टोबर 2022 ला दुपारी 12.00 ते 4 .00वाजेपर्यंत गायत्री मंगल कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर भव्य मोफत “महाआरोग्य” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बाळूभाऊ धानोरकर चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा तर अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार हे उपस्थित राहणार आहे. या शिबिरात हृदय रोग तज्ञ, मेंदूरोग तज्ञ, पोटविकार तज्ञ, मूत्ररोग तज्ञ उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहे तसेच मेडिसिन विभाग, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, बालरोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, जनरल फिजिशियन, दन्तरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, फिजिओथेरपी विभाग असणार आहे.
तसेच आता हे शिबिर कायर प्रथमच होत आहे. या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा दुर्धर अथवा गंभीर आजार असेल, हृदयरोग, किडनीचे आजार, मेंदूचे आजार, कॅन्सर, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कानाचे आजार, पोटाचे आजार, संधीवात अशा कुठल्याही आजाराबाबत या शिबिरात उपचार केले जाणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी व नोंदणीची मोहिम सुरू आहे.
तेव्हा कायर परिसरातील सर्व स्त्री,पुरुष, वृद्ध व मुलांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ महेंद्र लोढा, पुरुषोत्तम आवारी, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, नंदकिशोर अंबोरे यांनी केले आहे .
कायरगावातील आकर्षक बाब……..
“त्यातही येत्या निवडणूक बघता गावपुढारी खुप जोमात लोकांना सहकार्य करण्याचा देखावा देखील गावात सुरू असल्याची खमंग चर्चाही ऐकायला येत आहे. त्यात कधीही गावात लोकांसाठी न धावणारे काही कामापुरते असणारे पुढारी अग्रेसर आहेत. अशीही जोरदार चर्चा आहे कारण म्हणतात ना की, “दिखावे हैं दम’ अशी गाव पुढारी करीत आहे. तसेच या शिबिराचा माध्यमातून काही संधी साधू गावपुढारी “खूप मोठा देखावा ” करीत असल्याची खमंग चर्चा ही रंगू लागली आहे.