•ग्रामपंचायतची ‘अळीमिळी गुपचिळी’ अशी भूमिका.
अजय कंडेवार,वणी: आरोग्य तथा ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, गावातील 15 दिवसाआधी एकाला डेंग्यूची लागण झाल्याने गावातीलच एका खाजगी दवाखान्यात कळल्याने ग्रामवासीयात खळबळ उडाली होती तरीही आरोग्य विभाग व गावातील ‘मोठी म्हणणारी’ कायर ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
मागील 15 दिवसांपासून सुरू असलेल्या तसेच कायर गावात घाण पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तालुक्यात डासांची संख्या वाढत आहे. त्यातून अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. आता झिका विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बालकांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. परंतु, या बाबीकडे आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे. आजही अनेक रुग्ण तापाने फणफणत असून, खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे यासंदर्भात आरोग्य व ग्रामपंचायत विभागाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.कायर गावात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यातून गावागावात डेंग्यूचे रुग्ण वाढत चालले आहेत. लहान बालकांमध्ये डेंग्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येत आहे. डेंग्यूचे पहिले लक्षण ताप असल्याने विषाणूजन्य ताप समजून उपचार करण्यात येत आहेत.
ताप आल्यानंतर रुग्ण व कुटुंबीय हे खासगी दवाखान्याला प्राधान्य देत असल्यामुळे उपचारासाठी हजारो रुपये खर्च येत असल्याची परिस्थिती आहे. यासंदर्भात शासकीय यंत्रणेला काही प्रमाणात माहिती प्राप्त झाली. मात्र, कोणतेही निर्देश नसताना आपण का पुढाकार घ्यायचा, यामुळे अळीमिळी गुपचिळी अशी भूमिका आरोग्य विभाग व कायर ग्रामपंचायत यांची दिसून येत आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळले ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. वैद्यकीय व पंचायत विभागाच्या यंत्रणेतील वरिष्ठांनी प्रतिबंधात्मक व उपचारार्थ कामाला लागण्याचे निर्देश देण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढत असलेल्या डेंग्यू आजारासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.असे गावातही म्हंटले जाते की, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असणारा THO हे out of coverage असतोच.
“15 दिवसापासून डेंग्यूने तोंड वर काढले आहे. लहान बालके, महिला व पुरुष याचा परिणाम होत आहे. रुग्णांवर आतापर्यंत उपचार केले आहेत. अजूनही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डासांचे निर्मूलन केल्यास डेंग्यूला प्रतिबंध करता येऊ शकतो.”- डॉ. वैभव ढवळे.
“ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा उचलण्याची कामे नियमित सुरू आहेत तसेच डेंग्यू आणि गावात वाढणा-या साथीच्या आजाराची शक्यता गृहीत धरून गावांत धूर फवारणी केली जाणारच तसेही दर 15 दिवसांनी फवारणी सुरू आहे. आरोग्य विभागाने अधिकृत अशी माहिती दिली नाही की डेंग्यू रुग्ण आहे परंतू खाजगी दवाखान्यात पत्र पाठवून डेंग्यूची माहिती गोळा कली जाईल .”- उमेश वानखडे (ग्रा.पं सचिव , कायर )