•पारंपारिक पद्धतीने निघाली रॅली
•बिरसा मुंडा जिंदाबाद, उलगुलान जिंदाबाद….. नाऱ्यानी गुंजले गाव….
अजय कंडेवार ,वणी :– आदिवासी समाजामध्ये आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना एक देवता म्हणून पुजले जाते. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कायर गावात प्रतिमेला ज्येष्ठ समाज बांधव यांचा हस्ते हार अर्पण करून गावात पारंपरिक पद्धतीने रॅली काढले व विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जनतेने आपल्या मूलभूत अधिकाराच्या पूर्ततेसाठी संघर्ष करणे आवश्यक आहे व हा संघर्ष करणेच म्हणजे खऱ्या अर्थाने शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याला पुढे नेणे होय आणि तसा संकल्प करून कार्याला लागणे म्हणजेच त्यांचा जयजयकार होय”, असा सूर कायर येथील रॅलीत झालेल्या शहीद वीर बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमात गावकरी तर्फे करण्यात आला.
झारखंड राज्यात रांचीच्या ऊलीहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरसा यांना आदिवासी समाजाबद्दल आपुलकी होती. इंग्रज आपल्या समाजावर अन्याय करीत आहेत, अशी त्यांची भावना होती. त्यातून त्यांनी आदिवासी समाजातील लढवय्या युवकांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. 1897 ते 1900 या काळात इंग्रज सैनिक व आदिवासी यांच्यात युद्ध झाले. त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांच्याकडे होते. आदिवासी बिरसा यास धरती बाबा या नावाने ओळखले जात होते. 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक झाली. रांची येथील कारागृहात 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडांचे निधन झाले. तेव्हापासून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी के ली जाते.
या रॅलीचा वेळी समस्त गावातील समस्त समाज बंधु ,युवक व महिला मोठ्यप्रमाणात उपस्थित होते.