•वणी शिरपूर-मुकुटंबन पोलिसांची हद्द तर महसूल कोमात..
अजय कंडेवार,वणी:- सद्या वणी तालुक्यातील कायर भागात येणाऱ्या विदर्भां नदीच्या पात्रातून मोठया प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होत आहे. मात्र याकडे दोन्ही पोलीस ठाणे व महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप ग्रामस्थ करतांना दिसते आहे. इतकेच नव्हे तर पहाटे अभ्यासासाठी उठणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्वनिप्रदूषण चा त्रास होत असल्याचे विद्यार्थी सांगताहेत. आता प्रशासन यावर आळा घालणार की,नेत्यांची मनोपल्ली चालू देणार हे बघणे महत्वाचे आहे.
कायर परिसरात असलेल्या विदर्भां नदीच्या पात्रातून रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा होतो आहे. नेत्यांचे हितचिंतक असल्याने प प्रशासनाशी साटेलोटे असल्याने रेती चोरटे सामान्यांना काहीच समजत नाही असे चित्र आहे. नदी पात्रातून उपसा केलेली वाळू सिंधी वाढोना गावातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करीत आहे. रात्री दीड ते पहाटे सहा वाजेपर्यंत सारखी वाहनांची रेलचेल असते.
पहाटे विद्यार्थी अभ्यासाला उठतात त्यांचा आवाजाने अभ्यासही होत नसल्याचे विद्यार्थी सांगताहेत. मात्र पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग गप्प का? हा प्रश्न कायम आहे. रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याने शासनाच्या महसूल कराचे तीनतेरा वाजले आहे. आता महसूल प्रशासन आणि पोलीस कोणती कारवाई करणार हे महत्वाचे आहे.