•ग्रामपंचायतीचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत.
•”अब ‘नागराजा’ बाकी सब गाजा वाजा “असे मुजोर धोरण मोडणे गरजेचे.
अजय कंडेवार,वणी :- कायर येथील गावकरी सध्या घाणीच्या साम्राज्यत वास्तव्य करीत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे .कारण विकासाचे योग्य नियोजन नसल्यामुळे गावात व विशेषतः गावातील अनेक वॉर्डांत मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत व या प्रशासनाला गावकरी देखील हतबल झाले आहे. गावात सद्यातरी “अब ‘ नागराजा ‘….. बाकी सब गाजा वाजा “असे मुजोर धोरण मोडकिस गावकऱ्यांनी आणले पाहिजे. सद्यस्थितीत गाव वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसते आहे.Kayar village is in the midst of problems….the health of the villagers is in danger.The neglectful policy of Gram Panchayat is responsible. “Ab ‘Nagaraja’ baki sab gaja waja” must be broken.
गावातील नाल्या तुडूंब भरून नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे गावात मच्छरांचे प्रमाण वाढून, डेंगू, मलेरिया, ताप, खोकला, यासारख्या अनेक आजारांना गावकऱ्यांना बळी पडावे लागणार आहे. तसेच ऐन पावसाळ्याच्या दिवसात अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे . काही लोकांच्या घरातील सांडपाणी वाट सापडेल त्या दिशेने जात असल्याने रस्त्यावर पाण्याचे डबके तयार होऊन व रस्ता उखडून सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गावकऱ्यांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागत आहे इतकेच नव्हे तर शाळेत जाणाऱ्या लहान चिमुकल्या मुलांना ,स्त्रियांना या दुर्गंधी युक्त रस्त्याचा सामना करावा लागत आहे.
तसेच गावातील गायी, म्हशी, व त्यांचे गोठे ,वैरण असून रस्त्यावर संपूर्ण घाण पाणी येत असल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या लहान मुलांपासून तर वयोवृद्ध पुरुष व महिला वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक तक्रारी करून सुध्दा ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसत आहे. तेव्हा गावकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या समस्यांचे निराकरण करावे अशी मागणीला जोर आलेला आहे. मग आता कोमात असलेले “जागे होईल का? आणि प्रशासनाला कामी लावून गावात पसरलेली तापाची साथ व निर्जंतुकीकरण करून काही उपायजना करेल का ? स्वच्छतेकडे लक्ष देईल का?याकडे नागरिकाचे लक्ष लागले आहे.