•गावपुढारीचे उड्या मारणे सुरु,पुढारी शर्यती लावण्यात व्यस्त
• गावातील अतिक्रमण विरोधी निवेदन देणारेही उभे व गरिबांना वाचविणाराही ‘राकेश’ सरपंचासाठी उभा… मतदार राजा करेल निर्णय ?
• जनतेला कोणत्याही क्षणी आधार देणारा सरपंच हवा की, सरपंचपद निवडून येण्याकरीता खर्च करणारा ठेकेदार पाहणारा हवा ?
अजय कंडेवार ,वणी:- ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) निवडणुकीसाठी (election) गावपातळीवर राजकारण (politics) तापण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी कुटुंबातच कलह निर्माण होऊ लागला आहे.
कायर गावात सरपंचासाठी एकूण 3 उमेदवारानी नामनिर्देशन केले आहे तर 29 ग्रा . प. सदस्यांनी नामनिर्देशन केले त्यात 3 पॅनल एकमेकांसमोर उभे आहे. थेट ग्रामपंचायत सरपंचपदासाठी उभे असलेल्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.विशेषतः गावपुढारीचे उड्या मारणे सुरु,पुढारी शर्यती लावण्यात व्यस्त आहे असे बोलल्या जात आहे. तसेच गावातील अतिक्रमण विरोधी निवेदन देणारे उभे व गरिबांना वाचविणाराही सरपंचासाठी उभा आहे. मतदार राजा करेल निर्णय ? यावरुन असेही लक्षात येते की,जनतेला कोणत्याही क्षणी आधार देणारा सरपंच हवा की, सरपंचपद निवडून येण्याकरीता खर्च करणारा ठेकेदार पाहणारा हवा ? कारण असेही बोलल्या जात आहे की ,गावपुढारी मेरा ही सरपंच आयेगा अशी जोरदार भूमिका दिसून येत आहे.
विशेषतः गावकऱ्यांमध्ये अशीही एक खमंग चर्चा दिसून आली की एक कामाचा देखावा करणारा सरपंच उभा आहे आणि एक जनतेला आधार देऊन गाव विकास करणारा उभा आहे. विशेष ही गाव निवडणुक चर्चेचा विषयच आहे.चला बघुया समोर….!