•कायर भागात रेती तस्करांची होतेय वाढ,कमी वेळात श्रीमंत बनण्याचे स्वप्न…
•यातीलच काही निवडणूक रंगविण्याचा तैयारीत का?
अजय कंडेवार,वणी:- कायर गावातून रेतीची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चातमक माहिती समोर आली आहे. स्थानिक रेती घाटाचे लिलाव न झाल्याने रेती माफिया स्थानिक लोकांना चढ्या भावाने रेतीची विक्री करीत असल्याचे बोलल्या जात आहे. या अवैध तस्करीला खुद्द प्रशासनातील वरिष्ठांचा किँवा महसूल कर्मचारीचा हाथ आहे काय? परिणामी, रेती माफिया जोमात, तर प्रशासन मात्र कोमात असे म्हणण्याची पाळी जनतेवर आली आहे.
रात्रीला मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर ने वाहतूक करीत असल्याचे बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरण अनेक महिन्यापासून सुरू असून स्थानिक महसुल प्रशासन सुस्त कसे..? असा प्रश्न नागरिकानां पडला आहे. प्रशासन सुस्त असल्याचा फायदा घेत रेती माफियांनी रातोरात श्रीमंत होण्याची शक्कल लढविली असून याला स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आश्रय लाभला असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. परंतु यातीलच काही निवडणूक रंगविण्याचा तैयारीत आहे का? हे सुध्दा जनतेतून बोलल्या जात आहे.
आता कारवाई होईल का की, यातही पाणी मुरेल? याकडे लक्ष गरजेचे…….
कायर परिसराकडे दुर्लक्ष का? आणि महसूल अधिकारी गप्प का ?
तालुक्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी गप्प का असा सवाल आता कायर परिसरातील नागरिक करीत आहे. एकीकडे जड आणि ईतर अवैध वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करायची आणि दुसरीकडे रेती भरून येणाऱ्या ट्रेलर, ट्रॅक्टर, हायवा गाड्यांना सूट द्यायची असा प्रकार रात्रीला राजरोसपणे कायर परीसरात सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला आता उधाण आले असून तस्करांची संबंधित विभागासोबत हित संबंध तर नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे.