Tuesday, July 15, 2025
Homeकायर गावकायर आठवडी बाजारात सुविधांचा अभाव....!

कायर आठवडी बाजारात सुविधांचा अभाव….!

•तरीही कामाचा निस्त बोम्या…?,ग्रामपंचायतचे स्पष्ट दुर्लक्षित धोरण.

अजय कंडेवार ,वणी:– आठवडी बाजार’ हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतल्या आर्थिक व्यवहारांचे मोठे ठिकाण आहे. ‘आठवडी बाजार’ म्हणजे ग्रामीण भागाच्या आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला आधार.आठवडी बाजार’ हा ग्रामीण अर्थचक्र फिरवणारा महत्त्वाचा घटक. ग्रामीण भागातील शेतकरी, समाजघटक, अलुतेदार, बलुतेदार, अल्पसंख्याक, फिरस्ते (भटक्या जातीजमाती) या सर्वांचे आर्थिक व्यवहार याच बाजारावर आधारलेले असतात. परंतु ग्रामपंचायतला यातून उत्पन्नही जोरदार असते पण याच बाजारात कायर ग्रामपंचायतचे माणसे तर सोडाच, जनावरेही जाऊ शकत नाही अशी अवस्था आज रोजीचे चित्र दिसत आहे.म्हणून आठवडी बाजार त्याचा स्थायिक जागेवर भरत नसून थेट शाळा व बँके समोरच भरत आहे. मग बाजारात भाजीपाला विक्रेते व व्यापार्‍ यांकडून नाहक वसुली केली जाते ते कशासाठी ? कारण बाजारातील मुलभूत सुविधांकडे ग्रामपंचायत मुंग गिळून बसल्याचे दिसून येत आहे.Lack of facilities in the cowardly weekly market..Still a load of work…?

तालुक्यातील कायर येथे दर गुरूवारी आठवडी बाजार भरतो.ही मोठी बाजारपेठ असून अनेक गावांमधील नागरिकांसाठी हा आठवडी बाजार अत्यंत महत्वपूर्ण आहे. मात्र सध्या हा बाजार अक्षरश: चिखलात, अंधारात व पाण्याअभावी व शौचालयाअभावी भरत असल्याचे वास्तव चित्र आहे. तरीही विकासाच्या बोम्या सुरूच.परिसरातील 10 ते 15 गावातील नागरिक आठवडाभराचा किराणा व भाजीपाला खरेदीसाठी येथील आठवडी बाजारात येतात. परंतु या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते व व्यापार्‍यांना बसण्यासाठीही व्यवस्थित कोणतीही सुविधा नसल्याने चक्क चिखलात, अंधारात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागल्याचे दिसून आले.

आठवडी बाजारात जिकडे तिकडे अस्ताव्यस्त स्वरूप, चिखल, अंधार असल्याने नागरिकांना बाजार करतेवेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचे काही देणेघेणे नसल्याचे चित्र येथील आठवडी बाजारातील झालेल्या अवस्थेला पाहून होत आहे. म्हणतात ना,”अपना काम बनता…. जाये जनता”असे स्पष्ट बोलके चित्र या बाजारातून दिसून येत आहे. या आठवडी बाजारात 100 ते 150 भाजीपाला विक्रेते व व्यापारी येतात तर खरेदीसाठी 3 ते 4 हजार ग्रामस्थांची वर्दळ असते .परंतु या बाजाराच्या मैदानात भाजीपाला विक्रेत्यांना बसण्याची कोणतीच सुविधा नसल्याने चक्क चिखलात बसूनच भाजीपाला विक्री करावा लागला. परिणामी चिखलाने घाणीने माखलेल्या भाज्यांची ग्रामस्थांना खरेदी करावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात घाणीचे साम्राज्य असल्याने व्यापार्‍यांच्या मालावर माशा बसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास अधिक धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु येथील ग्रामपंचायत प्रशासन हा Kayar Bazaar आठवडी बाजार हर्रास करून आपली जबाबदारी झटकण्यातच धन्यता मानते. आठवडी बाजार संपल्यावर दुसर्‍या दिवशी बाजारात घाण पडलेली असते त्याची स्वच्छतासुद्धा करण्यात येत नाही. आठवडी बाजारात पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत. अशा अनेक समस्या असून येथील ग‘ामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांकरिता आहे की कशासाठी आहे, असाही प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहेत.

“विदर्भ न्यूज” ला दिलेली प्रतिक्रिया…….

हा आठवडी बाजार आधीपासून असाच सुरू आहे. आम्ही ग्रामपंचायत ठरावात मध्ये सार्वजनिक शौचालयाची मागणी केली होती त्यातून एक मंजूरही झाले आहे.ते लवकरच नागरिकांचा सेवेकरीता बाजारवाडीत उपलब्ध होईल आणि ठरावात बसण्याकरीता वटे देखील तयार करण्यात येणार आहे. तसेच बाजारात लाईट त्यादिवशी (गुरुवारी) नसल्याचे कारण म्हणजे त्याठीकाणातील लाईटचे काम सुरू होते म्हणून ती परिस्थिती कदाचित झाली असावी .येत्या गुरुवारपासून आठवडी बाजार हा नियोजित जागेवरच भरविणार असेही आश्वासन कायर ग्रा.पं सचिव यांनी याबाबत आश्वासन दिले. तसेच गावात नाली काढण्याचे कार्य ग्रामनिधीतून करण्याचे सुरू आहे. व्यापाऱ्यांचा व नागरिकांचा होणारी समस्या दूर होईल,अशी प्रतिक्रिया व्यवस्थितरित्या ग्रा.पं.सचिव उमेश वानखेडे यांनी दिली.”

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments