• करंट लागून युवा कामगाराचा मृत्यू.
• जबाबदार कोण घेणार ठेकेदार की घरमालक?
अजय कंडेवार,वणी:- कामावर घरगुती मोटार उचलण्यासाठी गेलेल्या मिस्त्री कामगाराचा विद्युत प्रवाहाचा झटका बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार 3 ऑक्टो सोमवार रोजी दुपारी 3 चा दरम्यान वणी येथील DreamLand City एका नवीन घराच्या बांधकामात उघडकीस आलेली माहिती आहे.
प्रवीण भगवान गुरनुले (29) रा .कायर असे मृत्यू झालेल्या युवा कामगाराचे नाव आहे. प्रवीण हा Dreamland City येथिल मिस्त्री कमावर जात होता. तिथे एका घराचे बांधकाम सूरू होते. त्या घरचा कामावर एका गड्ड्यात पाणी साचलेले होतें . ते पाणी काढण्याकरिता त्या कामगाराने घरगुती मोटार पंप सुरू केली व जेव्हा त्या गड्ड्यातील पाणी पूर्णपणे बाहेर पंप द्वारा फेकल्या गेले व शेवटी त्या पंपाला काढण्याकरिता प्रवीण गेला असता तिथे त्या पंपला हाथ लागताच त्याला विद्युत प्रवाहाचा जोऱ्याचा झटका व लगेचच आली. तेथीलच काहीं मजुरांनी त्याला ताबडतोड शहरातीलच ग्रामीण रुग्णालयात उपचारसाठी नेले असता तेथे डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केले.
त्याचा अश्या जाण्याने कायर गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ,बहीण असा आप्तपरिवार आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविले असून पुढील तपास वणी पोलीस ए.एस.आय प्रभाकर कांबळे करीत आहेत.