•पोलिस ठाण्यात गून्हा दाखल.
अजय कंडेवार,वणी:- ‘तू माझ्या कामाची तक्रार का केली’ असे म्हणून वंचितचे अध्यक्ष दिलीप भोयर यांना मारहाण केली. एवढेच नव्हे तर तू गाडीतून खाली उतर असे म्हणत धक्काबुक्की करून मारहाण, शिवीगाळ व धमकीही दिली. ही घटना भरदिवसा वणी शहरात घडली. याबाबत वणी पोलीस स्टेशन रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
दिलीप रामदास भोयर (वय 45), रा. वणी असे फिर्यादीचे नाव आहे. तर मारेकऱ्याचे कृषिकेश रमेश उंबरकर (वय 42), रा. वणी नाव आहेत. फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्ती यांनी वणीतील एका पान शॉप जवळ चारचाकी गाडीला मारेकऱ्याने थांबविले व दिलीप यांनी गाडीचा काच खाली केला असता, खिडकीतूनच मारेकऱ्यानी शिवीगाळ करीत, दिलीप यास मारहाण करीत धमकी देत म्हणाले,”‘तू माझ्या कामाची तक्रार करते’असे म्हणत तोंडावर बुक्की मारली व दुसऱ्यांदा भेटला तर खैर नाहीं म्हणत तेथून पळ काढला. त्या झटाटपित फिर्यादीचे 1 तोळ्याचा सोन्याचे गोप देखिल पडलें असल्याची तक्रारीत आहे. त्या मारहाण झाल्या ठिकाणाहून दिलिप भोयर यांनी थेट वणी पोलिसात मारेकऱ्याविरोधात रितसर तक्रार नोंदविली व विविध कलमांतर्गत गुन्हा करण्यात आलें. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
” सध्या गुन्हेगारांनी तोंड वर काढत भांडणे,मारामाऱ्या त्याचबरोबर दुचाकी चोऱ्या ही बाब तर नित्याचीच झाल्याचे दिसत आहे.दहशतीचं प्रमाण वाढत आहे. शुल्लक कारणावरुन मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवसभरात एक तरी मारहाणीच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे वणी पोलीस यांच्यावर कारवाई काय करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. “