•कुटुंबियांवर शोककळा…
अजय कंडेवार,वणी:– काँग्रेस (congress) नेते तथा वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांना पितृशोक झाला आहे.याचे वडील रामचंद्र तुकाराम खाडे अल्पशा आजाराने यांचे दि.19 ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे निधन झाले.
रामचंद्र पाटील खाडे वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीपासूनच यांच्यावर नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात सुरू होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती नाजूकच होती. पण त्यांची सकाळीं अचानक तब्येत बिघडली आणि 19 ऑक्टोबर रोजी दुपारीच रामचंद्र खाडे यांनी अखेरचा श्वास सोडला. यांच्या निधनानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,जावई , नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.रामचंद्र खाडे यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे गुरूवार 19 ऑक्टो. रोजी सायं 5 वाजता अंत्यविधी पार पडणार आहे.