•प्रतिभाताई धानोरकर याबाबतचा दावा पास की फेल ?
•निवडणूक तयारीत काँग्रेस पिछाडीवरच
•भाजपचा लोकसभा संभाव्य उमेदवार यादीत डॉ. अशोक जिवतोडे अग्रेसर अशी जनसमान्यातून खमंग चर्चा.
अजय कंडेवार,वणी:- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून वरोरा–भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रकाश देवतळे, माजी चंद्रपूर कृऊबा सभापती दिनेश चोखारे यांच्यासह आठ जणांनी रितसर अर्ज करून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आगामी काळात लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात चांगलीच चुरस होणार आहे. दरम्यान कुणबी व तेली समाजाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
वणी – आर्णी – चंद्रपुर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण, काँग्रेसची तयारी मात्र अतिशय संथगतीने सुरू असल्याचे दिसते. या देण्यात आलेल्या 8 नावांवरून अद्यापही तळ्यात मळ्यात वातावरण आहे. काँग्रेस लोकसभा प्रबळ उमेदवारीचा दावा कुठे अडले, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारल्या जात आहे. अद्याप तरी कुणीही निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागलेले नसल्याने कार्यकर्त्यांना प्रबळ दावेदार उमेदवारांच्या नावाची प्रतिक्षा लागलेली आहे. उशिरा प्रबळ उमेदवाराचे नाव पुढे आल्यास लोकसभा मतदारसंघात हे उमेदवार पोहोचू शकतील काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे.काँग्रेसकडून मध्यंतरी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची नावे मागविण्यात आली होती . त्यात अनेककांनी इच्छाही दर्शविली.अशात अनेक काँग्रेसचे दिग्गज बाशिंग बांधून तयार असल्याने अनेक नावांची चर्चा होत आहे. विशेषतः प्रतिभाताई धानोरकर याचे नाव अग्रस्थानी मानल्या जात आहे तरीही येणाऱ्या काळात काय होईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
पदाधिकारी, कार्यकर्ते प्रतिभाताई धानोरकर आग्रही असल्याचेही बोलले जाते. पण, अद्याप तरी काँग्रेसकडून त्या 8 पैकी खरा दावेदार कोण हे नाव पुढे आलेले नसून कुणी तयारीदेखील करताना दिसत नाही. अशा स्थितीत कुणाचे नाव लोकसभेकरिता समजावे, कोण तयारी करणार, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्याही नावाची जोरदार कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांचा दावा पास की फेल ? येणारा काळ सांगेल वरिष्ठांचा ” हाथ ” कुणावर… परंतु एका व्हायरल पोस्टने भाजपचा लोकसभा संभाव्य उमेदवार यादीत डॉ. अशोक जिवतोडे अग्रेसर असल्याची माहिती आहे.
“लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांकडून अद्यापही मतदारसंघात जोरात तयारी दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात मात्र संभ्रम आहे. काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सर्वांनाच उत्सूकता लागलेली आहे.”