Tuesday, May 13, 2025
HomeBreaking Newsकलेक्टर साहेब....."झोला" रेती घाट प्रकरणी वणी महसूल प्रशासनाची कारवाईच "झोल"......!

कलेक्टर साहेब…..”झोला” रेती घाट प्रकरणी वणी महसूल प्रशासनाची कारवाईच “झोल”……!

•"त्या तलाठी व मंडळ अधिकारी"यांचेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी. •पाणी मुरत कुठं आहे हो साहेब, वेळ मारून नेत आहात का?

Ajay Kandewar,Wani:- वर्धा नदीपात्रातील झोला घाटात जेसीबी व दोन टिप्परद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यावरून शनिवारी मध्यरात्रीनंतर जेसीबी कंपनीची पोकलेन मशीन व रेती भरलेला एक हायवा (MH ४० एन ६६७०) जप्त केला व एका हायवा चालकाने तेथून वाहनासह पळ सुद्धा काढला. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे,झोला येथील मंडळ अधिकारी आणि तलाठी अनभिज्ञ कसे होतें.त्यांचा कार्यक्षेत्रात एक अवैध घाट पोखरून त्याठिकाणी हजारों ब्रास रेती चोरट्याकडून चोरीला जाते आणि त्यांचा कार्यक्षेत्रात पोकलेन मशीनने रेती चोरी केल्या जाते.हे “त्या दोघांना” माहीत नसणे म्हणजे “लोगो को पागल समझने की नीती “ असा प्रकार त्यांचा कडून केला गेला आणि “शासकीय तिजोरीला करोडो रुपयांचा चुना या दोघांमुळेच लागला अस स्पष्ट या “झोला घाट प्रकरणात ” दिसून येत असताना ही तहसिलदार साहेब हे वरिष्ठांना पत्र व्यवहार करून तात्काळ करा . परंतु या तलाठी व मंडळ अधिकारी” यावर कृपा कसली आणि या प्रकरणी नेमके पाणी मुरत कूठे आहे असे अनेक प्रश्न उभे झाले आहे. म्हणून या प्रकरणी वणीतील समाजसेवक यांनी 23 एप्रिल रोजी वणी SDO व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना पत्र देत यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचा विरोधात तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहीजे अन्यथा आपणाकडून असे होत नसल्यास मला तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर गुन्हा वाखल करण्याकरितां परवानगी द्यावी अशी मागणी लावून धरली आहे.

वणी तहसीलदार यांनी शनिवारी रात्री २ वा. झोला या गावाजवळील वर्धा नदीवरील अवैधरित्या पोखरलेल्या घाटावर धाड मारली.त्या कारवाईत एक हायवा ट्रक, जेसीबी कंपनीचे पोकलेंन्ड मशीन जप्त केले. त्या हायवा ट्रक व मशीन मार्फत रेती तस्करी सुरु होती .अंदाजे सहा महिन्यापासून ” विवेकबुध्दीने ” रेती तस्करी जोमात सुरु होती. परंतू त्या कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी डोळेझाक करीत अर्थपुर्णे दुर्लक्ष केले. विशेषतः त्या घाटात अख्खं घाट त्या रेती चोरट्याने पोखरल तरीही या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केली हे यातून दिसत असतांनाही महसूल अधिकारी व तहसीलदार यांनी  “त्या तलाठी व मंडळ अधिकारी” यांना तात्काळ निलंबन करून गुन्हा दाखल करण्याऐवजी  ” वेळ मारुन नेण्याचे कामं सूरू आहे” यामुळे वणी SDO व यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी या दोघांवर (तलाठी व मंडळ अधिकारी) यांचावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आपणाकडून असे होत नसल्यास मला तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर गुन्हा वाखल करण्याकरितां परवानगी द्यावी अशी मागणी वणीतील समाजसेवक यांनी लावून धरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments