•शिरपूर भागात ठाणेदाराचा वाढला दरारा,कारवाया देखील वाढल्या.
अजय कंडेवार,वणी :- शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कायर रोड वरील पठारपुर फाटा येथे तेलंगणा जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला असून घटनास्थळावरून 4 लाख रू पिकअप वाहन व 77हजार रुपये किमतीचे 3 नग गोवंशाची सुटका करून एका आरोपीला अटक करीत एकूण 4 लाख 77 हजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिरपूर पोलीस कर्तव्यावर असताना गुप्त बातमीदारांकडून वरोरा ते देऊळवाळा मार्गावरून जनावरांना निर्दयीपणे दोरीने बांधून बोलेरो गाडीत कोंबून जात असल्याची माहिती दि.11 डिसे रोजी मिळाली. बीट जमादार यांनी तात्काळ ही माहिती ठाणेदार A.P.I संजय राठोड यांना कळविले, माहिती मिळताच पोलीस स्टाफ व पंचासह कायर रोड वरील पठारपुर फाटा मार्गे जाणाऱ्या रस्त्याजवळ सापळा रचला असता रात्री 6 वाजताचा दरम्यान यामार्गे 1 ईसम हे 3गोवंशीय जनावरांना बोलेरो पिक अप वाहन क्रं MH-34- AV-0904 या वाहनातून एकमेकांना दोरीने बांधुन कोंबून गाडीत नेतांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवुन त्यांच्या नाव पत्ता विचारले असता त्यांनी ही सदर जनावरे कत्तलीकरिता नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.शिरपूर पोलिसांनी जनावर तस्कराच्या ताब्यातून 3 गोवंश बैलांची सुटका करून चारापाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गोरक्षण ट्रस्ट येथे पाठविले. तसेच महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांच्या कत्तलीवर प्रतिबंध असताना कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारा आरोपी शामराव नागोराव नंदुरकर वय 52 वर्ष रा. येन्सा ता .वरोरा जि.चंद्रपुर याच्या विरुद्ध प्राण्यांचा क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (घ), (च), (ङ), मो.वा.कायदा 83/177, महाराष्ट्र पोलीस अधीनियम 1951 चे कलम 119 नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Dysp गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई शिरपूर ठाणेदार API संजय राठोड यांच्या सूचनेनुसार पोलिस कर्मचारी यांनी केली .