Ajay Kandewar,Wani:- पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थानअंतर्गत पोलिस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वणी पोलिस ठाण्यातर्फे १२ जानेवारी रोजी वणी ठाण्याचे ठाणेदार P.I अनिल बेहरानी यांनी तालुका क्रीडा संकुलन शासकीय मैदान वणी येथे यवतमाळ जिल्हा क्रिडा महोत्सव कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट या सामन्यांचे उद्घाटन केलें.या सामन्यात वणी पोलीस स्टेशन हद्दीतील क्रिकेट,व्हॉलीबॉल व कबड्डी असे विविध सामने घेण्यात येत आहे.यात एकूण 12 संघाने सहभाग नोंदविला.सामने संपल्यानंतर विजय संघाला योग्य बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.