•रोजगार सेवक संघटना आक्रमक
माणिक कांबळे /मारेगाव:- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची अमलाबजावणी करणाऱ्या रोजगार सेवकाना अपमानजनक वागणूक देणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या आपरेटरला तात्काळ हटविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा रोजगार सेवक संघटना तालुका शाखा मारेगावच्या वतीने गटविकास अधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या तक्रार अर्जातुन देण्यात आला आहे.DELETE THE OPERATOR ELSE.Employee sevak union aggressive.
ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर ऑपरेट करण्यासाठी आपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले. असून रोजगार सेवकांच्या अमलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात आहे. येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड आहे. रोजगार सेवकां कडून स्थानिक कामे करून घेण्यासाठी आपरेटरला पैसे मिळत नसल्याने त्यांची कामे प्रलंबीत ठेवली जात असून चिरीमिरी देणाऱ्या ठेकेदाराची कामे तातडीने केली जाते असा आरोप तक्रारीतुन करण्यात आला आहे. ग्रामसभेने सुचविलेल्या विकास कामाची अमलाबजावणी करण्यासाठी पंचायत समितीच्या आपरेटर ची महत्व पूर्ण जबाबदारी आहे. यामध्ये ऑनलाईन मस्टर काढणे, मजुरी अदा करणे, ऑनलाईन मंजुरात घेणे इत्यादी कामाचा समावेश आहे. मात्र रोजगार सेवकांनी सादर केलेल्या मागणीच्या प्रस्तावा कडे दुर्लक्ष करून ठेकेदारांनी सादर केलेल्या प्रस्तावाची दखल येथील आपरेटर बादल खंडरे यांचे कडून घेतली जात असल्याने त्यांना तात्काळ या टेबलवरून 15दिवसाचे आत हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या मागणी अर्जातून देण्यात आला आहे.
तक्रार अर्जावर संघटनेचे अध्यक्ष खुशाल येरगुडे, सचिव भगवान धाबेकर,उपाध्यक्ष प्रशांत सपाट, सहसचीवं गनपत मडावी, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, रमेश सिडाम, महादेव गुरुनुले, शौलेश पेंदोर, नारायण सुसराम, विवेक नरवाडे, स्वप्नील ठावरी, गणेश कालेकर, आशिष किनाके, नितेश काटकर, मनोज दडाजे, संदीप जिवणे, वामन डोंगे, आशिष भोयर, गणेश कुळमेथे, सिद्धार्थ खैरे, शेषराव देवाळकर,अमित खीरटकर, गजानन बोधे,प्रमोद जुमनाके, संतोष बल्की, इत्यादीच्या सह्या आहेत.