•म.फुले चौक येथील घटना.
अजय कंडेवार,वणी:- शहरातील महात्मा फुले चौक भागात राहणाऱ्या एका इसमाने सोमवार ता. १५ जाने २४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुणाल पुरूषोत्तम मोडक (४३ वर्ष) रा. म. फुले चौक, वणी असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.
मृत कुणाल हा आपल्या परिवारासोबत शहरातील फुले चौक येथे राहत होता. कुणाल हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. हा रंगरंगोटीचे काम करीत होता. सोमवारी कुणालने घरातील लाकडी फाट्याला दोरीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. दुपारचा सुमारास घरी असलेल्या कुणालचा पत्नीने त्याचा रूममध्ये डोकावून पाहिले असता ,कुणाल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत लटलेल्या अवस्थेत दिसला. बाजूला असणाऱ्याचा सहाय्याने त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी कुणाल याला मृत घोषित केले.कुणाल यांच्या मागे पत्नी, मुलगी, व आई असा आप्तपरिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. कुणालने हे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.