अजय कंडेवार,वणी :– एका वायरल पोस्टनी वणी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातही भूकंप आल्याची चर्चा जोरदार सूरु आहे .याचे नेमके कारण विजय चोरडिया यांनी एका ग्रूपवर टाकलेल्या पोस्टनी सामाजिक क्षेत्र हादरले .त्या पोस्टमध्ये रामनवमी उत्सव समितीच्या अध्यक्ष पदाचा तडकाफडफी राजीनामा…. बाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.तालुक्यात रामनवमी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येते. यावर्षीही हा उत्सव साजरा करण्याकरिता 26 मार्च 2022 रोजी समितीचा अध्यक्षपदी विजय चोरडिया यांची एकतर्फी निवड करण्यात आली होती.
मात्र अचानकपणे दिनांक 12 फेब्रुवारीला विजय चोरडिया यांचा राजीनाम्याचा एका वायरल पोस्टनी शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातही भूकंप आल्याची चर्चा जोरदार सूरु आहे. यामागील नेमके अद्यापही कळू शकले नाही. परंतू येणाऱ्या काळात अंतर्गत काहीं बाबी उघड होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.कारण विजय चोरडिया यांनी एका ग्रूपवर टाकलेल्या पोस्टनी सामाजिक क्षेत्र हादरले .. हे तेव्हढेच खरे. परंतु अवघ्या काहीं महिन्यातच राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले .जसे की, अवघ्या काही महिन्यातच तडफातडफी राजीनामा देण्यास कोण भाग पाडले असावे? किंवा काहीं अंतर्गत गटबाजी तर नाही ना ? 100% नेहमी योगदान करणारा कसा राजीनामा देईल? काहीं अंतर्गत राजकारण तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न चटके लाऊन जाणारे……हे सर्व कोडच…!
हीच ती पोस्ट……….