•तात्काळ गुन्हे मागे घ्या.
अजय कंडेवार, वणी:- इजहार ग्यासुदीन शेख यांच्यावरील सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याकरीता एकता मालवाहक चालक-मालक असोशिएशनने निवेदनाद्वारे दि.21 ऑगस्ट रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना साकडे घातले आहे.
एकता वाहक-चालक असोसियशन अध्यक्ष यांच्यावर दि. १०-०८-२०२३ रोजी वणी पोलीस स्टेशन येथे विविध कलमाद्वारे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. वास्तविक पाहता या प्रकरणाशी संघटनेचे अध्यक्ष इजहार शेख यांचा काहीही संबंध नसला तरीही त्यांना या प्रकरणात गोतल्या गेले.मागील १५ वर्षापासून शहरातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून शहरातील नागरिकांकरितां कोरोना काळांत त्यांनी मोठ्या प्रमाणांत आर्थिक केली तसेच इतर सामाजिक कार्यात ते नेहमी तत्पर असतात व इतरांच्या मदतीला देवी बाजन जातात. अश्या शांत, मनमिळावू स्वभावी नागरिकांना मदत करणा-या इजहार शेख यांना खोटया गुन्हयात अडकाविण्याचा प्रयत्न होत आहे.करिता पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष देवून संघटनेचे अध्यक्ष इजहार ग्यासुदीन शेख यांच्यावर खोट्या कलमाचा गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी संघटनेद्वारे करण्यात आली.यावेळी महंमद शमी महंमद सुलेमान, उस्मानखान इब्राहीमखान पठाण, शेख आसीफ शेख फैय्याज,विजय सहारे,विनोद राजुरकर,भास्कर देठे,रशीदखान पीरखान पठाण,कलीम शेख मोईनुद्दीन शेख,वासीफ शेख हे सर्व उपस्थित होते.