अजय कंडेवार, वणी : वणी तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘घडामोडींचे तापमान’ चढू लागले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा कट्टर कार्यकर्ता आणि विजय चोरडीया यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे उमेश पोद्दार यांनी अचानक उबाठा गटात एन्ट्री घेतल्याने राजकीय समीकरणे हादरली होती. कारण संपूर्ण विजय चोरडिया यांचा गट माजी आमदार संजीवरेड्डी बोधकुरवार यांना भोवला होता. आता एन नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी शिवसेना शिंदे गट जाहीर प्रवेश केला. यातही आता पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, कारण उमेश पोद्दार नेमका आता कोणत्या पक्षात “राजकीय फटाके” फोडणार आणि शिंदे गटात “बॉम्ब” टाकणार? असा प्रश्न वणीच्या प्रत्येक राजकीय गल्लीबोळात गुंजू लागला आहे.
चोरडिया यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतला, आणि त्यांच्या जवळचा मानला जाणारा उमेश पोद्दार मात्र अजूनही उबाठा गटात ‘धीराने’ थांबलेला दिसतो.मात्र सूत्रांच्या मते, पोद्दार सुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर चालत आहेत, आणि त्यांच्या सोबत काही प्रभावशाली कार्यकर्तेही ‘ट्रान्सफर’ होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.राजकीय वर्तुळात प्रश्न असा की,उमेश पोद्दार उभाटात फटाके फोडणार की शिंदे गटात बॉम्ब टाकणार?आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत या ‘स्फोटाचा’ आवाज किती दूरपर्यंत जाणार? विधानसभेत आ.संजूभाऊ दरेकरांच्या विजयात उबाठा गटाला मोठा फायदा झाला होता.आता त्यांचा ‘मुखिया’ च विजय चोरडीया शिवसेना शिंदे गटात गेल्याने “उमेश “कोणासोबत उभा राहील, यावर वणीतील राजकीय चित्रच ठरणार आहे. राजकारणातील हा ‘उमेश पोद्दार ट्विस्ट’ येत्या काही दिवसांत कोणता विस्फोट घडवतो, हे पाहणे वणीकरांसाठी तितकेच रोचक ठरणार आहे. जर असे झाले नाही तर नक्कीच “दुहेरी” राजकारण एका छतातून चालणार एवढा शंभर टक्के सत्य असणार आहे. परंतु हे इथे थांबले नाही तर शिंदे गटात गेलेल्या विजुभाऊ चोरडिया यांचा पुत्र हा भाजपाचा उपजिल्हाध्यक्ष आहे. त्यावर भाजपा देखील कसा वागतो हे येत्या काळात नक्कीच दिसणार आहे.

वणीच्या राजकीय गल्लीबोळात फक्त एकच चर्चा….
उमेश पोद्दार लवकरच शिंदे गटाच्या वाटेवर चालू शकतात, आणि त्यांच्या सोबत काही प्रभावशाली कार्यकर्त्यांचा ‘राजकीय ट्रान्सफर’ होण्याची चिन्हे दिसत आहेत.मात्र ही घडामोड फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. जर पोद्दार शिंदे गटात गेले, तर वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणात मोठा ‘विस्फोट’ होऊ शकतो.कारण विधानसभेच्या निवडणुकीत उबाठा गटातून आ. संजूभाऊ दरेकर यांचा “विजय” हा “पोद्दार” यांच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभा होता.आता ‘मुखिया’ विजय चोरडिया शिंदे गटात गेल्याने उमेश पोद्दार कोणासोबत उभा राहील,यावर वणीचे पुढील राजकारण ठरेल.परंतु हे समीकरण इतके सोपे नाही.चोरडिया यांचा पुत्र सध्या भाजपचा उपजिल्हाध्यक्ष आहे.हणजे एकाच छतातून दोन राजकीय दिशा.एक शिंदे गटाकडे, दुसरी भाजपकडे यालाच “दुहेरी राजकारणाचा प्रयोग” म्हणत आहेत.भाजप यावर कोणती भूमिका घेईल?शिंदे गटाला याचा किती राजकीय फायदा मिळेल?हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.वणीच्या राजकीय पटावर सध्या “उमेश पोद्दारच पुढचा पाऊल कुठे” हा प्रश्नच सर्वाधिक गाजत आहे.तो फटाक्यांचा आवाज ठरेल की स्फोटाचा, हे येत्या आठवड्यात ठरणार आहे पण एवढं निश्चित की वणीचं राजकारण आता पुन्हा एकदा पेटणारच आहे.

