•सरपंच बोरपे यांचा घणाघाती आरोप.
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यातील शिरपूर ग्राम पंचायत येथील जलशुध्दीकरण सर्वत्रातील ए.टि.एम. मशिनव्दारे जमा झालेल्या रकमेमध्ये उपसरपंच मोहित चचडा यांनी “अफरातफर” केले ,असा घणाघाती आरोप शिरपूर ग्रा.पं.सरपंच जगदिश बोरपे यांनी केला आहे. या बाबतीत सरपंच बोरपे यांनी गटविकास अधिकारी यांना दि.18 सप्टें ला निवेदन देत या प्रकरणातील सखोल चौकशी करून सबंधीत उपसरपंच मोहित चचडा यांचेविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.Sarpanch Borpe’s allegation.
वणी तालुक्यातील ग्रा.पं.शिरपुर येथिल अधिनल जल शुद्धीकरण यंत्र आहे. या जलशुद्धीकरण सयंत्रामधील पाण्याचा पुरवठा ए.टि.एम.मशिनमध्ये 5 रुपयाचे नाणे टाकल्यानंतर पाण्याचा पुरवठा ग्राहकांना केल्या जाते. ATM मशिनमध्ये दर दिवसाला किमान 500ते 600 रुपये जमा होते. संपुर्ण मशीन जर भरली कमीत कमी 8 ते 9 हजार रू होतात.तसेच हा जमा A.T.M मशिन कॉइनबॉक्स पुर्णपणे भरल्यानंतर आठवडयातून 1 ते 2 वेळा मशिन कॉइनबॉक्स उघडण्यात येते व त्यातील जमा रकमेचा पंचानामा ग्रामपंचायत सदस्य व काही गावकरी यांच्या समक्ष केल्या जाते व त्यानंतर जमा झालेले नाणींचे नोटामध्ये रूपांतर करण्याकरीता बँक खात्यामध्ये रक्कमेचा भरणा करण्यात येतो.
परंतू असा कोणताही अधिकार नसतानाही उपसरपंच मोहित चचडा यांनी अनेक नियम डावलले.जल शुद्धीकरण संयंत्रामधील ATM मशिन मधिल जवळपास 3 ते 4 महिन्याची रक्कम इतर पदाधिकारी, सदस्य तसेच येथिल ग्रा.पं.शिरपुर यांनाही विश्वासात न घेता परस्पर काढुन बँक खात्यामध्ये भरणाही केलेला नाही.अशाप्रकारे स्वमर्जीने शासकीय पैशाची उधडण करीत असल्याची बाब लक्षात आले.म्हणून सरपंच यांनी पुढाकार घेत शासकिय रक्कमेमध्ये उपसरपंच मोहीत चचडा यांनी हजारो रुपयांची अफरातफर असा घणाघाती आरोप निवेदनातून केला आहे.
या झालेल्या प्रकाराला विरोध करीत स्वतः सरपंच यांनी उपसरपांचा बद्दल या प्रकरणातील सखोल चौकशी करून सबंधीत उपसरपंच मोहित चचडा यांचेविरुद्ध कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी केली. यावर वरिष्ठ अधिकारी चौकशी कधी करेल याकडे लक्ष लागले.
“विदर्भ न्युज” ला दिलेली प्रतिक्रिया….
“सरपंच जगदीश बोरपे यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहे कारण मशीनचे पैसे काढताना मी सर्वांना विश्वासात घेतले. काही कागदोपत्री पुरावे ही मी सादर करणार आहो.वरिष्ठ अधिकारी यांचा चौकशीचे उत्तर देण्यास सज्ज आहो.– मोहित चचडा (उपसरपंच, ग्रा.पं.शिरपूर )