•ठाणेदार प्रदिप शिरस्कर व ठाणेदार गजानन करेवाड यांची उल्लेखनीय कामगिरी.
अजय कंडेवार,वणी:– मुद्देमाल निर्गती, दोषसिद्ध, सीसीटेनस, मिसिंग व गुन्हे निर्गती तसेच तपासाची तत्परता, जनसामान्यांत पोलिस दलाची असलेली प्रतिमा आणि एकूणच कामातील सुसूत्रता आणि शिस्तबद्धता जोपासणाऱ्यांमध्ये शिरपूर ठाणे व वणी ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने अव्वल स्थान पटकवित वणी उपविभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड , अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप ,SDPO संजय पुज्जलवार यांनी सातत्याने केलेले मार्गदर्शनामुळे शिरपूर पोलीस ठाणे मध्ये एप्रिल महिन्यात एकूण 243 मुद्देमालाची निर्गती करण्यात आली. यात वणी उपविभागाचे या पोलिसांचे नावही जिल्ह्यात अव्वल यात शंका नाहीच.These ‘two thanes’ of the sub-division became the top in the district.Remarkable performance of PI Shiraskar Shirpur Thanedar A.P.I Gajanan Karewad.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला गून्हे परिषद घेतली जाते .जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड व अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप रूजू होताच यांचा संकल्पनेतून 5 हेडखाली जसे मुद्देमाल निर्गती, दोषसिद्ध, सीसीटेनस, मिसिंग व गुन्हे निर्गती यात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशनला गौरविण्यात येते. त्यात तीन क्रमांक असतात प्रथम स्थानला चषक व प्रमाणपत्र देत असतात द्वितीय व तृतीय स्थानला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत असते. हा उपक्रम मागील सहा महिन्यांपासून अतिशय उत्तमरित्या सूरु आहे. हा उपक्रम पोलिस दलाला बूस्टर डोजच म्हणायला हरकत नाही.
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात दर महिन्याला गून्हे परिषद घेतली जाते .यवतमाळ येथे गून्हे परिषदमध्ये मागील महिन्यात विविध हेडखाली सर्वात चांगली कामगिरी करणारे पोलीस स्टेशन यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. त्यात शिरपूर ठाण्यातील ठाणेदार यांना मुद्देमाल निर्गीती एप्रिल 2023 महिन्यात जिल्ह्यात अव्वल कामगिरी करणारे प्रथम क्रमांकाचे पोलीस शिरपूर ठाणे तर दोषसिद्ध मध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच वणी पोलीस ठाण्याला दोषसिद्धमध्ये अव्वलस्थान म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पोलिस निरीक्षक प्रदिप शिरस्कर वणी पोलीस स्टेशन ठाणेदार व स.पो.नि. गजानन करेवाड यांच्या कामगिरीबद्दल विशेष अभिनंदन देण्यात येत आहे. भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करुन पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यात मोलाची कामगिरी कराल ही अपेक्षा व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
कोड…..
” जिल्हातील वरिष्ठ अधिकारी तसेच S.D.P.O संजय पुज्जलवार यांनी सातत्याने केलेले मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाले.”- स.पो.नि.गजानन करेवाड (ठाणेदार, शिरपूर पोलीस स्टेशन)