•महाराजांचा अभिषेक हा 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत.
•मनसेद्वारा भव्य शिवजयंती उत्सव.
अजय कंडेवार,वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात येत असून यावर्षी Tomorrow in Vani, “The appearance of attractive forts” and “Jai Bhavani, Jai Shivaji’s alarm…आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखाव्यासह संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोषणाई करण्यात आली आहे भव्य फटाक्याच्या आतिषबाजीसह हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. विशेषतः दिनांक 10 मार्च ला सकाळी सुमारे 6 वाजून 54 मिनिटाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक हा 21 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

त्यानंतर दुपारी 4 वाजता वणी मारेगाव झरी या वणी विधानसभा क्षेत्रातून असंख्य युवक दुचाकीने वणी शहरात दाखल होतील व संपूर्ण वणी शहरामध्ये बाईक रॅली द्वारा फेरफटका मारून शिवाजी चौकात दाखल होतील.
तसेच सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून चौकात उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे उद्घाटन मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे करतील त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीसह विद्युत रोषणाई , लेजर शो द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साजरा करण्यात येईल.
“वणीचा इतिहासात पहिल्यांदाच आकर्षक गडकिल्ल्यांच्या देखाव्यासहTomorrow in Vani, “The appearance of attractive forts” and “Jai Bhavani, Jai Shivaji’s alarm…संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोषणाई करण्यात आली आहे.तरी सर्व शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

