•’सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन ‘च्या वतीने.
अजय कंडेवार,वणी :- ” जिथे कमी तिथे आम्ही” हा विचार बाळगून आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच विपरीत परिस्थितीत मेहनत करून जिद्दीने पुढे जाण्याऱ्या विद्यार्थ्यांना किरण देरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनने ‘ अनेकदा मदतीचा हात पुढे केला आहे. हे काही नवीन नाहीच याचाच एक भाग म्हणून आता सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन शाखा राजुर (कॉ.) च्या वतीने इयत्ता १० वी, १२ वी, विविध परीक्षेत तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्याकरिता गुणगौरव सोहळा उद्या शनिवार दि. २४ जुन २०२३ ठीक दुपारी १२.०० वाजता साई मंदीर परिसर, साई नगरी, वार्ड क्र. २ इथे आयोजित करण्यात आला आहे. Meritorious students will be honored tomorrow at Rajur. On behalf of ‘Sanman Stree Shakti Foundation’.
सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून किरणताई देरकर (अध्यक्षा- सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन )व कार्यक्रमाचे उद्घाटिका भारती राजपूत,(अध्यक्षा, जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख मार्गदर्शक म्हणून माया चाटसे. (ए.पी.आय. पोलीस स्टेशन ,वणी) व गुणवंत पचारे (कर्मयोगी संत गाडगे बाबा विचार प्रचारक, वणी) हे असतील व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संघदीप भगत( माजी जि.प.सदस्य) प्रमोद मिलमिले.महेंद्र श्रीवास्तव, सुरेखा आवारी,माया आसुटकर (मुख्याध्यापिका)अशोक भगत (माजी उपसरपंच),धानोरकर सर (मुख्याध्यापक), राजेश निरे(मुख्याध्यापक),प्रकाश तालावार (शिक्षक,धोपटाळा) व कन्हैया कलपूलवार (अध्यक्ष.साई चॉरिटेबल ट्रस्ट, राजुर) हे असणार आहेत.
राजुर परिसरात सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे तरी समस्त पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.