•माजी आमदार वामनराव कासावार वाढदिवसाचे औचित्य
अजय कंडेवार, वणी:- येथील माजी आमदार वामनराव कासावार यांचा वाढदिवस दरवर्षी 24 जाने.रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो.याच अनुषंगाने मंगळवार दि. २४ जानेवारी २०२३ ला स. ११ ते दु. ४ वा. स्थळ : आदर्श हायस्कुल, मुकूटबन ता. झरी जा. इथे भव्य आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर तसेच विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या आरोग्य व रक्तदान शिबिराला मधुमेह व हृदयरोगतज्ञ जनरल फिजीशियन डॉ. अभिजीत नुगुरवार M.D. (Med.),नेत्ररोगतज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार D. Opth.
,प्रसुती स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेंद्र लोढा, DGO डॉ. अनुपमा कासावार DGO,दंतरोगतज्ञ डॉ. मृणाल नुगुरवार B.D.S.,आर्थोपेडीक व वातरोगतज्ञ डॉ. सुबोध अग्रवाल D. Ortho,दमा रोग तज्ञ डॉ. आशिष केंद्रे M.D.,बालरोगतज्ञ डॉ. संदिप मानवटकर M.D,पोटविकार तज्ञ व जनरल सर्जरी डॉ. देविदास शामला M.S. Mch (Paeditric Surgeon) या विशेष टीमचा उपस्थीतीत भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी या शिबिराची जय्यत तयारी सुरू असून जास्तीतजास्त रुग्णांना या शिबिराचा लाभ कसा मिळेल असा झरी तालुका काँग्रेस कमेटी व वणी विधानसभा युवक काँग्रेस आयोजकांचा आहे. त्यात लोढा मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, वणी व गजानन मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, आदिलाबाद यांचे विशेष सहकार्य आहे.