•”नुरी कमिटीचा” स्तुत्यमय उपक्रमाचे दर्शनही..
अजय कंडेवार,वणी:-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 वी जयंती वणी शहरातील राजूर परिसरात जल्लोषात साजरी करण्यात आली. मध्यरात्रीपासूनच भीम सैनिकांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजीने अभिवादन केले. यावेळी ‘उद्धरली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे”,तुला देव म्हणावं कि भिमराव म्हणावं,दोनच राजे इथे गाजले एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर आदि भिम गीतांसह संपूर्ण राजूर परिसरात निळे झेंडे लावण्यात आल्याने वातावरण निलमय झाले .
विशेषतः आंबेडकर जयंतीनिमित्त गावात नुरी कमिटी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 14 एप्रिलचा रात्री अभूतपूर्व रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यात समाजबांधवाकरीता सरबत वाटप देखील करण्यात आले.
नुरी कमिटी, राजूर....
तसेच रॅलीतील जेष्ठ नागरिकांचा विशेष उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयभीमच्या नाऱ्यानी यावेळी राजूर गाव निळ्या रंगात व डि.जेच्या जोशात आसमंत दुमदुमून गेला होता. राजूर येथील बुद्धविहार येथून रॅली काढन्यात आली . तेथून दीक्षाभूमी पोहचेपर्यंत तब्बल 3 तासाचा कालावधी लागला.जयंती साजरी करण्यासाठी दीक्षाभूमी चौकात महिला-पुरूष व तरूणांचा जनसागर उसळला. या रॅलीत फटाक्यांची आतिषबाजी करत तरूणांनी जल्लोष केला.या रॅलीचे स्वागत करतांन नुरी कमिटी व समस्त राजूर मित्रपरिवार उपस्थित होते. यातून एक समाज एकात्मतेचा संदेशही या कमिटीने दिला.